इंदापूरच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसारखी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:11 AM2021-05-11T04:11:44+5:302021-05-11T04:11:44+5:30

इंदापूर शहारातील बाजारपेठ काल सोमवारी प्रचंड गजबजलेले दिसून आली. विविध व्यावसायिकांसोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, ग्राहकांनी प्रचंड गजबजून गेली ...

Crowds thronged the Indapur market like Diwali shopping | इंदापूरच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसारखी उसळली गर्दी

इंदापूरच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसारखी उसळली गर्दी

Next

इंदापूर शहारातील बाजारपेठ काल सोमवारी प्रचंड गजबजलेले दिसून आली. विविध व्यावसायिकांसोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, ग्राहकांनी प्रचंड गजबजून गेली होती. मात्र, कोविड प्रतिबंधबाबत नागरिकांनी कोणतेही नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे या गर्दीचा परिणाम येणाऱ्या पाच दिवसांत संपूर्ण तालुक्याला भोगावे लागणार आहेत.

इंदापूर बाजारपेठेत नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळलेले दिसून आले नाही. तालुक्यातील नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती की, कोरोनाचे संकट आहे की नाही..! असेच चित्र बाजारपेठेत दिसून आले. इंदापूर तालुक्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या घरात पुरेसा अन्नधान्य, मसाले आदींचा साठा करून घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. गर्दी एवढी प्रचंड होती की , बाजारपेठेत अनेकवेळा ट्रॅफिक झालेले दिसून आले. असे दृश्य असताना प्रशासनाने फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची दिसून आले.

बाजारपेठेत अनेक नागरिकांनी मास्क लावले नव्हते तर कोणीही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नाही. सॅनिटायझर वापरताना दिसले नाहीत. मागील दोन दिवसांत स्वॅब टेस्ट दिलेले अनेक रुग्ण बाजारात फिरताना दिसले. नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र, प्रशासनाने सायरन वाजविण्याशिवाय कोणतीही उपाययोजना केलेली दिसून आले नाही.

---

चौकट : येणाऱ्या चार-पाच दिवसांत याच गर्दीचे रूपांतर कोविड बाधितांमध्ये होण्याची भीती

इंदापूर शहरात एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती की, जणू काही आपण कोरोना हद्दपार केले आहे. नागरिकांना घाईत खरेदी करताना, आपल्या तालुक्यात दररोज ३०० च्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळतात याचे भान राहिले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या चार-पाच दिवसांत तालुक्यात कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.

फोटो ओळ : इंदापूर शहरातील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी उडालेली झुंबड.

Web Title: Crowds thronged the Indapur market like Diwali shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.