बीआरटीचे कोट्यवधी रुपये पाण्यात

By Admin | Published: March 14, 2016 01:25 AM2016-03-14T01:25:57+5:302016-03-14T01:25:57+5:30

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत बनविण्यासाठी बीआरटी योजना पुण्यात प्रथम हडपसर ते स्वारगेट या मार्गावर सुरू करण्यात आली. परंतु या बीआरटीमुळेच या रस्त्यावर वाहतूककोंडी

CRT billions of rupees in water | बीआरटीचे कोट्यवधी रुपये पाण्यात

बीआरटीचे कोट्यवधी रुपये पाण्यात

googlenewsNext

हडपसर : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मजबूत बनविण्यासाठी बीआरटी योजना पुण्यात प्रथम हडपसर ते स्वारगेट या मार्गावर सुरू करण्यात आली. परंतु या बीआरटीमुळेच या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेतून कोट्यवधींचा निधी मिळत असल्याने राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष त्या पैशांकडेच. त्यात ही बीआरटी योजना शास्त्रीय पद्धतीने कशी राबविली जाईल, याकडे लक्ष न देता नियोजनशून्य पद्धतीने केवळ सायकल ट्रॅक, फुटपाथ, दुभाजक आणि बसथांबे यावर कोट्यवधींचा खर्च करून राजकीय पुढारी व पालिका अधिकारी नामानिराळे झाले आहेत. सध्या मात्र या अर्धवट आणि तुटलेल्या बीआरटी मार्गामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत.
सध्या हडपसर ते स्वारगेट या बीआरटी मार्गावर एकसलग अशी एक किलोमीटरही बीआरटी योजना असल्याचे दिसत नाही. नियमित रस्ता आणि बीआरटी रस्ता यात फरकच राहिला नाही. याउलट काही ठिकाणी तुटलेल्या बीआरटीच्या दुभाजकामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अडथळ्याची शर्यत ठरत आहे. मिक्स बीआरटी केवळ बोगसपणा असल्याचे येथील जाणकारांचे म्हणणे आहे. बीआरटी मार्गातून केवळ बीआरटीच्या बसेसच धावतील, असे नियोजन होते. मात्र सध्या या मार्गातून बस आणि इतर सर्वच वाहने धावतात. रामटेकडी येथील उड्डाणपूल उतरताच बीआरटीचा दुभाजक तुटला आहे. मगरपट्टा चौकात उड्डाणपूल बांधकामाच्यावेळी येथील बसथांबा व दुभाजक तोडला आहे.
४हडपसर उड्डाणपुलाखाली बीआरटीच्या बसेस जाण्यासाठी केलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता पडून आहे. गाडीतळ येथील नवीन सासवड उड्डाणपुलाच्या कामासाठी येथील फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तोडून टाकण्यात आला आहे. फातिमानगर चौक व मगरपट्टा
येथील या बीआरटी बसेसच्या बसथांब्यांची मोठी दुरवस्था
झाली आहे.४बीआरटी मार्गात अन्य वाहनांनी शिरू नये, असे असले तरी हडपसर परिसरात बीआरटी मार्ग सलग नसल्याने अनेक वेळा नवीन प्रवासी काही मीटर बीआरटी मार्गात जातात. मग यांना पोलिसांकडून नो एंट्रीचा दंड आकारला जातो.
४फुटपाथ आणि सायकल ट्रॅकचा वापर हा तर येथील वाहन पार्किंग, फळविक्रेते आणि पथारी व्यावसायिकांनाच होत असल्याने मुख्य रस्त्यावरूनच सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना जावे लागत आहे. बीआरटीत अनेक त्रुटी असल्याने सत्ताधारी व विरोधकांनी वेळोवेळी आंदोलने केली असली तरी हा मार्ग व बीआरटीची अडथळ्याची शर्यत कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
४फातिमानगर चौकात सध्या येथील कोंडीमुळे उड्डाणपुलाची गरज भासू लागली आहे. रेसकोर्स ते फातिमानगरदरम्यान नित्यच कोंडी होत असते. लांबच लांब रांगा लागतात. गोळीबार मैदानापासून एकेरी वाहतूक असल्याने वाहनचालकांना रस्ता मोकळा मिळतो. तेथील रस्त्यावर वाहतूक सुरळीत असते. मात्र रेसकोर्सपासून या रस्त्यावर वाहतुकीचे पुन्हा हडपसरपर्यंत ग्रहण लागते.

Web Title: CRT billions of rupees in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.