बीआरटी दुरुस्तीसाठी दोन कोटींचा चुराडा

By admin | Published: November 17, 2015 03:19 AM2015-11-17T03:19:55+5:302015-11-17T03:19:55+5:30

संगमवाडी ते विश्रांतवाडी, आळंदी रोड, नगर रोड येथील बीआरटी मार्ग तयार झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आल्याची माहिती उजेडात

Crush two crores for repair of BRT | बीआरटी दुरुस्तीसाठी दोन कोटींचा चुराडा

बीआरटी दुरुस्तीसाठी दोन कोटींचा चुराडा

Next

पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी, आळंदी रोड, नगर रोड येथील बीआरटी मार्ग तयार झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून त्यांच्या वेतनापोटी कोट्यवधी रुपयांचे बिल काढण्यात आले असतानाही हा खर्च का करावा लागला, अशी विचारणा वडगाव शेरी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
संगमवाडी ते विश्रांतवाडी, आळंदी रोड, नगर रोड बीआरटी मार्ग तयार झाल्यानंतर मार्च २०१४ पासून तिथे सुरक्षारक्षक नेमून त्यांना वेतन अदा करण्यात आले आहे. मात्र, बीआरटी मार्गावर बसथांबा व अ‍ॅटोमेटिक अ‍ॅल्युमिनियम स्लायडिंग डोअर यांची मोडतोड झाल्याने तसेच काही वस्तू चोरीला गेल्याने दुरुस्तीसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. आळंदी रोड बीआरटी मार्गासाठी ३६ लाख, नगर रोडसाठी ९८ लाख, संगमवाडी रोडसाठी १२ लाख, अ‍ॅटोमेटिक स्लायडिंग डोअरसाठी ४१ लाख असा पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च दुरुस्तीसाठी केला आहे.
बीआरटी मार्गावर प्रत्यक्षात सुरक्षारक्षकांची नेमणूक न करताच त्यांचे बिल काढण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांच्या हजेरीपत्रकावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ठेकेदाराने अतिरिक्त सुरक्षारक्षक पुरविले नसतानाही जास्तीचे बिल काढण्यात आल्याचा आरोप आशिष माने व कनिझ सुखरानी यांनी केला आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेने ११०० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यास मंजुरी दिली असताना प्रत्यक्षात १६०० सुरक्षारक्षक नेमण्यात आले. या वाढीव सुरक्षारक्षकांच्या वेतनापोटी १८ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकारांतर्गत ही अनियमितता समोर आली आहे.

आळंदी रोड बीआरटी मार्गासाठी ३६ लाख, नगर रोडसाठी ९८ लाख, संगमवाडी रोडसाठी १२ लाख, अ‍ॅटोमेटिक स्लायडिंग डोअरसाठी ४१ लाख असा पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च दुरुस्तीसाठी केला आहे.
महापालिकेच्या मुख्य सभेने ११०० सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यास मंजुरी दिली असताना प्रत्यक्षात १६०० सुरक्षारक्षक नेमण्यात आले. या वाढीव सुरक्षारक्षकांच्या वेतनापोटी १८ कोटी ६० लाख रूपये मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मंजूर केला आहे.

Web Title: Crush two crores for repair of BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.