दारूच्या नशेत विटांनी ठेचून मित्रांनीच केला खून
By admin | Published: March 17, 2016 03:04 AM2016-03-17T03:04:14+5:302016-03-17T03:04:14+5:30
जवळच्या मित्रांनीच दारूच्या नशेत सिमेंटच्या विटांनी ठेचून एकाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना १५ मार्चच्या रात्री ७ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली)
लोणी काळभोर : जवळच्या मित्रांनीच दारूच्या नशेत सिमेंटच्या विटांनी ठेचून एकाचा निर्घृणपणे खून केला. ही घटना १५ मार्चच्या रात्री ७ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली. कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूलच्या मैदानालगत ही घटना घडली.
मोहसीन मेहबूब तांबोळी (वय २६, लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मद्य पिण्याच्या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्याने हा प्रकार घडला असून गुन्हे शोध पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासांच्या आत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
मोहसीन याचे वडील मेहबूब गुलाब तांबोळी यांच्या फिर्यादीवरून प्रदीप सूर्यकांत काळभोर (वय २४) व सागर राजेंद्र कुंदेकर (वय २५, दोघेही लोणी स्टेशन) यांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याची कबुली दिली.
घटनास्थळी मद्याच्या बाटल्या, सिगारेटची थोटके, प्लॅस्टिकचे ग्लास, शीतपेयाची बाटली मिळाल्याने मद्य प्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी होता. तसेच या जागेवर रक्ताचे थारोळे साचले होते व रक्ताने माखलेल्या सात सिमेंटच्या विटा मिळून आल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत.
ते तिघेही चांगले मित्र असून
वेळ मिळेल त्या वेळी ते एकत्र बसून मद्यपान करायचे. मंगळवारी (दि. १५) अतिमद्यपान झाल्यानंतर त्या
तिघांत वाद झाला. याचे
पर्यवसान भांडणात झाल्याने काळभोर व कुंदेकर या दोघांनी मोहसीन यास सिमेंटच्या विटांनी ठेचून ठार केले.(वार्ताहर)