चुलतमामाने केले बालकाचे अपहरण

By Admin | Published: July 27, 2014 12:01 AM2014-07-27T00:01:59+5:302014-07-27T00:01:59+5:30

मळद (ता. दौंड) येथून साडेतीन वर्षाच्या बालकाचे चुलतमामाने अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Cuban kidnapping | चुलतमामाने केले बालकाचे अपहरण

चुलतमामाने केले बालकाचे अपहरण

googlenewsNext
दौंड : मळद (ता. दौंड) येथून साडेतीन वर्षाच्या बालकाचे चुलतमामाने अपहरण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन दिवसांनंतर अपहरण झालेला बालक सुखरूप घरी पोहोचला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. याप्रकरणी आरोपी मच्छिंद्र शेलार (रा. मळद, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे. 
याप्रकरणी अमोल झगडे (रा. मळद, ता. दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. बालकाच्या अपहरणाचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. संस्कार झगडे (वय साडेतीन वर्षे) हा आपली चुलतबहीण संस्कृती झगडे हिच्याबरोबर शुक्रवार (दि. 25) रोजी सकाळी 1क् वाजता बालवाडीच्या शाळेत येण्यासाठी शेलारवस्ती येथून निघाला होता. या दोघा भाऊ-बहिणीला मच्छिंद्र शेलार याने रस्त्यात गाठले. त्यानंतर आपण गावात जाऊन येऊ, असे सांगून संस्कार झगडे याचे अपहरण केले. दरम्यान, आरोपीने या बालकाला मुंबई परिसरात नेले होते.  (वार्ताहर)
 
4या बालकाचा त्याच्या नातेवाइकांनी शोध घेतला, मात्र त्याचा शोध लागला नाही. आरोपी हा या बालकाला घेऊन मळद येथे आला व गावातील उड्डाणपुलाच्या खाली मुलाला घेऊन बसला होता. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडले आणि याबाबतची माहिती दौंड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सजन हंकारे आणि त्यांच्या सहका:यांनी  मळद येथे जाऊन आरोपीला 
अटक केली. 

 

Web Title: Cuban kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.