खूनाच्या प्रयत्नातील गुन्हेगार अवघ्या आठ तासात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:02+5:302021-06-02T04:09:02+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश माधवराव नगरकर, राहणार जांभुळवाडी याने वैभव वाल्हेकर (रा. आंबेगाव पठार) यांच्याकडून दोन लाख इतकी रक्कम ...

The culprit of the attempted murder was arrested in just eight hours | खूनाच्या प्रयत्नातील गुन्हेगार अवघ्या आठ तासात जेरबंद

खूनाच्या प्रयत्नातील गुन्हेगार अवघ्या आठ तासात जेरबंद

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश माधवराव नगरकर, राहणार जांभुळवाडी याने वैभव वाल्हेकर (रा. आंबेगाव पठार) यांच्याकडून दोन लाख इतकी रक्कम हातऊसने घेतली होती. सदरची रक्कम परत देत नाही या कारणावरुन २९ मे रोजी सायंकाळी वैभव वाल्हेकर याने योगेश नगरकर यांना फालेनगर कमानी जवळ चर्चेसाठी बोलावुन घेतले. तेथे वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांनी योगेश नगरकर याचेशी पैशाचे कारणावरुन वादावादी झाली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन चाकु व चॉपर सारख्या धारदार व टोकदार हत्यारांनी योगेश नगरकर याचे पोटात सपासप चाकु खुपसुन तसेच त्याचे तोंडावर व इतरत्र हत्यारांनी वार केले. त्याला गंभिर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले होते. यातील जबर जखमी झालेले योगेश नगरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा भाऊ रविन्द्र नगरकर याने त्या बाबत वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांचे विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल तांबे व हर्षल शिंदे यांना आरोपी वैभव वाल्हेकर व त्याचे इतर साथीदार हे सातारा भागात असल्याची माहीती मिळाली. त्यानूसार यातील आरोपी वैभव वाल्हेकर, भुषण वाल्हेकर, तेजस चाळेकर, रोहीत कांबळे यांना सातारा येथुन तात्काळ ताब्यात घेवुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेल्या गाडया त्यांचेकडुन जप्त केल्या. गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम डिगे करत आहे.(रा. आंबेगाव पठार) यांच्याकडून दोन लाख इतकी रक्कम हातऊसनी घेतली होती. सदरची रक्कम परत देत नाही या कारणावरुन २९ मे रोजी सायंकाळी वैभव वाल्हेकर याने योगेश नगरकर यांना फालेनगर कमानी जवळ चर्चेसाठी बोलावुन घेतले. तेथे वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांनी योगेश नगरकर याचेशी पैशाचे कारणावरुन वादावादी झाली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन चाकु व चॉपर सारख्या धारदार व टोकदार हत्यारांनी योगेश नगरकर याचे पोटात सपासप चाकु खुपसुन तसेच त्याचे तोंडावर व इतरत्र हत्यारांनी वार केले. त्याला गंभिर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले होते. यातील जबर जखमी झालेले योगेश नगरकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा भाऊ रविन्द्र नगरकर याने त्या बाबत वैभव वाल्हेकर व त्याचे इतर तिन साथीदार यांचे विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल तांबे व हर्षल शिंदे यांना आरोपी वैभव वाल्हेकर व त्याचे इतर साथीदार हे सातारा भागात असल्याची माहीती मिळाली. त्यानूसार यातील आरोपी वैभव वाल्हेकर, भुषण वाल्हेकर, तेजस चाळेकर, रोहीत कांबळे यांना सातारा येथुन तात्काळ ताब्यात घेवुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेल्या गाडया त्यांचेकडुन जप्त केल्या. गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम डिगे करत आहे.

Web Title: The culprit of the attempted murder was arrested in just eight hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.