पिंपरगणे गावात परस बागेची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:57+5:302021-09-07T04:13:57+5:30
दैनंदिन जीवनात अनेक लोक परस बाग करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, पिंपरगणे गावातील महिलांनी परस बागेसाठी कंबर कसली आहे. ...
दैनंदिन जीवनात अनेक लोक परस बाग करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मात्र, पिंपरगणे गावातील महिलांनी परस बागेसाठी कंबर कसली आहे. पडीक वावर घेऊन त्या ठिकाणी बचत गटाच्या महिलांनी परस बाग लावली असून त्यामध्ये भेंडी, कारली, गवार, घेवडा, मुळा, भोपळा, दोडका, मिरची अशा प्रकारच्या अनेक भाज्यांची बियांची लागवड केली आहे.
शाश्वत संस्थेच्या समन्वयिका सुलोचना गवारी, प्रतिभा तांबे यानी तत्काळ बी-बियाणे उपलब्ध करून दिली. याबरोबर आदिवासी भागातील २० गावांना अशा प्रकारचा परस बाग उपक्रम राबविणार असल्याची माहिती भीमा गवारी यांनी दिली. पंचायत समिती आंबेगावच्या बचत गट समन्वयिका लता केंगले यांनी परस बाग लागवडी बाबत प्रशिक्षण दिले. भाजीपाला परवडत नाही, त्यासाठी आम्ही यात कष्ट व श्रमदान करून भाजीपाला पिकवण्याचा निश्चय केला आहे, अशा मुक्ताबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा मीना गवारी, सोनाली पारधी, कांताबाई गवारी, सोनाबाई वडेकर, हौसाबाई गवारी यांनी सांगितले.
०६डिंभे
पिंपरगणे येथे परसबाग लागवड करताना बचत गटातील महिला.