संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले; पुण्यात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 02:23 PM2021-04-06T14:23:33+5:302021-04-06T14:24:11+5:30

हॉटेल व्यवसाय क्षेत्राला लावलेल्या लॉकडाउन व निर्बंधांवर फेरविचार करा.

The curfew broke the collars of hoteliers; Hoteliers' agitation in Pune | संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले; पुण्यात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन

संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले; पुण्यात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन

Next

पुणे : राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, बार, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या निर्णयावर शहरातील अनेक व्यापारी, हॉटेल संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशन'या हॉटेल व्यावसायिकांच्या संघाने देखील 'लॉकडाऊन'चा आज जाहीर निषेध केला. 

पुण्यात मंगळवारी (दि.६) युनायटेड हॉस्पिलिटी असोसिएशनच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे मूक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी हातात फलक घेऊन आंदोलकांनी संचारबंदीचा निषेध केला आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप नारंग, उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे, सचिव दर्शन रावल, खजिनदार समीर शेट्टी हे उपस्थित होते. 

असोसिएशनचे अध्यक्ष नारंग म्हणाले,संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हॉटेलांसाठी जेवणाची परवानगी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत द्यावी. उत्पादन शुल्क परवाना शुल्काची संपूर्ण माफी करावी. तसेच सर्व परवानाधारक आतिथ्य व्यवसायांसाठी विद्युत दरात, औद्योगिक दरात कपात करावी.

रावल म्हणाले की, "आमच्या उद्योगाला लावलेल्या लॉकडाउन व निर्बंधांवर फेरविचार करावा. जेवणाच्या डिलिव्हरीसाठी परवानगी दिलेली वेळ पुरेशी नाही. त्यामुळे सरकारने आमचा विचार करून आम्हास न्याय द्यावा. युनायटेड हॉस्पिलिटी असो.च्या मागण्यांचा सर्वतोपरी विचार करून सरकारने आम्हाला दिलासा द्यावा."

Web Title: The curfew broke the collars of hoteliers; Hoteliers' agitation in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.