भोर शहरात संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:45+5:302021-03-30T04:08:45+5:30
दिवसेंदिवस भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मेडिकल व दवाखाने या अत्यावश्यक सेवा ...
दिवसेंदिवस भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मेडिकल व दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता भोर शहरात व ग्रामीण भागातील हाॅटेल, दुकान, माॅल सर्व उद्योग व्यवसाय राञी ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद ठेवून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय भोर प्रशासनाने घेतला आहे.
भोर तालुक्यात ८७ कोरोना रुग्ण आहेत. मात्र तरीही शहरातील व ग्रामीण भागातील मंगल कार्यालयात लग्न समारंभ, डीजे लावून वराती जोरात सुरु आहेत. क्रिकेट स्पर्धा गावागावांत मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोणत्याही
प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही.त्यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती आहे.त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन १४४ कलम लागू करुन शहरात व ग्रामीण भागात रात्री ८ ते सकाळी ७ या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भोर शहरात व ग्रामीण भागात एकूण ८७ जण कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहेत. तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्त २०१५२ उपचारानंतर घरी सोडलेले २००२० जण आहेत. तर स्वॅब तपासलेले १२१३६ जण आहेत. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्याने घेणे महत्त्वाचे असून प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.
भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ सुरु असून या वेळी नागरिक एकच गर्दी करीत आहेत. डीजे लावून नाचणे, रात्री वरात काढणे फटाके वाजवणे या वेळी कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर पाळले जात नाही. मंगल कार्यालयातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझरचा वापर नियम पाळणे कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही.
. शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पाॅझिटिव्ह वाढत गेले असून, एकूण ८७ जण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. प्रशासन सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. त्यामुळे मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.