पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:11 AM2021-04-05T04:11:16+5:302021-04-05T04:11:16+5:30
पुणे : पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेदरम्यान सलग १२ तास संचारबंदीची अंमलबजावणी शनिवारी ...
पुणे : पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेदरम्यान सलग १२ तास संचारबंदीची अंमलबजावणी शनिवारी रात्रीपासून सुरू झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात यापूर्वीच लागू केलेल्या संचारबंदीच्या वेळेत बदल होणार का, याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. याबाबत पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सध्या तरी पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. कदाचित ती सकाळी ७ वाजेपर्यंत वाढू शकेल.
शासनाने शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन हे चर्चा करुन त्याबाबतचे अतिरिक्त आदेश काढतील.
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर सध्या आहे. त्यामुळे शनिवारपासून शहर व जिल्ह्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या घोषणेप्रमाणे या वेळेत सध्या तरी बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शासनाचे लेखी आदेश आल्यानंतर त्यावर चर्चा करुन पुढील आवश्यक ते बदल करण्याची येणार आहे. मात्र, सायंकाळी ६ नंतरची संचारबंदी कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
.....
पुण्यात काेरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याने सध्या तरी सायंकाळी ६ पासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरुच राहणार आहे. शनिवार-रविवारच्या लॉकडाऊनबाबत महापालिका प्रशासनाची चर्चा करुन निर्णय घेतला जाईल
डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर