खरीपावर संचारबंदीचा परिणाम होणार नाही; कृषिविभागाची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:15 PM2020-05-14T15:15:52+5:302020-05-14T15:28:52+5:30
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी देखील लगबग सुरू केली आहे..
- रविकिरण सासवडे -
बारामती : जिल्हा परिषदेच्या कृषिविभागाच्यावतीने आगामी खरीप हंगामाची जय्यत तयारी झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीचा खरीप हंगामावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांना बियाणे व खते वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील. खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहोत, अशी माहिती प्रभारी जिल्हा कृषिविकास अधिकारी संजय विश्वासराव यांनी दिली.
पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये तृणधान्य व कडधान्य लागवडीखाली 1 लाख 49 हजार हेक्टर क्षेत्र येते. तृणधान्यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, नाचणी आदी तर कडधान्यामध्ये मूग, मटकी, पावटा, वटाणा आदी पिकांचा समावेश होतो. उर्वरित 81 हजार हेक्टर क्षेत्रावर गळीतधान्य लागवड होते. खरीप हंगामासाठी 1 लाख 80 हजार मेट्रिक टन खताच्या मागणीस शासनाने मंजुरी दिली आहे. आपल्याकडे 26 हजार क्विंटल बियाणाची मागणी केली होती. 28 हजार 686 क्विंटल बियाणे पुरवन्यात येईल असे महाबीज, नॅशनल सीड कॉपोर्रेशन तयारी दर्शवली आहे. येत्या पाच ते सहा दिवसात बियाणे पोहच होईल. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी देखील लगबग सुरू केली आहे. गहू, उन्हाळी बाजरीच्या काढण्या झालेल्या आहेत. शेत मशागत करून तापवली जात आहेत.
शेतकऱ्यांना खते व बियाणे चांगल्या दजार्ची तसेच योग्य दरात मिळावीत यासाठी कृषिविभाग लक्ष ठेवून आहे. यासाठी तालुकास्तरावर तपासणी पथक तयार ठेवण्यात येत आहे. स्वत: बियाणे कंपन्या सुद्धा याबाबत जागरूक आहेत. शेतकरी देखील खरेदी केलेल्या बियणाची पावती व नमुने जवळ बाळगत असल्याने निकृष्ट बियाणे पुरवणारावर कारवाई करता येते.
पीक निहाय, तालुका निहाय बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)
तालुका मागणी
आंबेगाव 2,460.69
बारामती 719.78
भोर 2, 540.89
दौंड 203.00
हवेली 629.93
इंदापूर 761.81
जुन्नर 5, 832.53
खेड 4, 156.15
मावळ 2, 809.12
मुळशी 1, 758.07
तालुकानिहाय मंजूर खते (मेट्रिक टनमध्ये)
तालुका खते
आंबेगाव 20, 475
बारामती 17, 804
भोर 5, 341
दौंड 16, 914
हवेली 16, 024
इंदापूर 17, 804
जुन्नर 21, 365
खेड 20, 475
मावळ 4, 451
मुळशी 4, 451
पुरंदर 9, 792
शिरूर 21, 365
वेल्हा 1, 780