सवाई महोत्सवाची उत्सुकता शिगेला

By admin | Published: December 9, 2014 12:32 AM2014-12-09T00:32:50+5:302014-12-09T00:32:50+5:30

देशविदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेला आणि अभिजात भारतीय संगीत ़क्षेत्रत मानबिंदू प्रस्थापित केलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Curiosity for the Sawai Festival | सवाई महोत्सवाची उत्सुकता शिगेला

सवाई महोत्सवाची उत्सुकता शिगेला

Next
पुणो : देशविदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेला  आणि अभिजात भारतीय संगीत ़क्षेत्रत मानबिंदू प्रस्थापित केलेला  सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.  
संगीतातील दिग्गज शिरोमणींसह नव्या कलाकारांच्या विभिन्न आविष्कारांची  सुरेल मेजवानी म्हणजे रसिकांसाठी आनंदाची पर्वणीच!   यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणारे नाही. सवाई गंधर्वसारख्या प्रतिष्ठित  महोत्सवात एकदा तरी आपल्या कलेचे सादरीकरण करण्याचे भाग्य मिळावे, अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची मनापासून इच्छा असते. तो  सुवर्णयोग यंदा जुळून आल्याने कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तब्बल नऊ नवीन कलाकारांना ऐकण्याची संधी यंदाच्या महोत्सवात  ‘कानसेनांना’ मिळणार आहे. तरुण कलाकारांच्या महोत्सवातील या सहभागामुळेच  युवा पिढीची पावलेही महोत्सवाकडे वळू लागली आहेत, हे देखील विशेष. 
 
यापूर्वी 5क् आणि 52व्या  सवाई गंधर्व संगीत महोत्सवात वडील चिदानंद जाधव यांच्याबरोबर सहवादन केले होते. यंदा स्वतंत्रपणो सुंद्रीवादन करण्याची संधी मिळाली असल्याने अतिशय आनंद होत आहे. हा महोत्सव म्हणजे संगीताची जत्रच आहे. दर्दी रसिक, केवळ कलाकारांना ऐकायला येणो, ही खूप मोठी गोष्ट आहे. महोत्सवात तब्बल बारा वर्षानंतर सुंद्रीवादन होत आहे. त्यामुळे रसिकांसाठी दुपारच्या सत्रतला एखादा राग वाजविल्यानंतर कर्नाटक संगीतातील ‘कजरी’, जी फारशी कधी कुणी ऐकली नाही, ती सादर करणार आहे.- भीमण्णा जाधव
 
 वडील एल. सुब्रrाण्यम यांच्या समवेत 2क्क्5मध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहवादन केले होते. जगभरातला हा एक प्रतिष्ठित महोत्सव असल्याने यामध्ये कला सादर करण्याची संधी मिळणो, हा एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे. दक्षिण आणि उत्तर संगीताचे मिश्र सादरीकरण महोत्सवात करण्याचे ठरविले आहे. यातून खूप वेगळी अनुभूती रसिकांना मिळेल.
- अंबी सुब्रrाण्यम
 
 पाच वर्षापासून सवाई गंधर्व संगीत महोत्सवात ऐकायला जात आहे. या महोत्सवात एकदा तरी गायला मिळावे, हे स्वप्न आज साकार होत आहे. रसिक अतिशय चोखंदळ असल्याने त्यांच्यासमोर कला सादर करण्याचे भाग्य मिळत आहे, याचा आनंद होत आहे. महोत्सवात सायंकाळची मैफल असल्याने ‘सरगम’ आणि खमाज रागात टप्पा सादर करणार आहे.
- सानिया पाटणकर
 
गुरुजी ए. कानन आणि पं. भीमसेन जोशी खूप चांगले मित्र होते. दोघांचे एकत्रित गायन ऐकण्याच्या सुवर्णमयी क्षणांची मी साक्षीदारही ठरली आहे. त्यांच्यासारखे कलाकार संगीत विश्वाला मिळणो, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सवाशी ¬णानुबंध जुळले आहेत.  महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळत आहे, याचा मनापासून आनंद होत आहे. पूरिया धनश्री रागातील विलंबित एकताल, मध्यताल, तीनताल आणि दृत एकतालातील स्वरचित बंदिशी महोत्सवात सादर करणार आहे. तसेच वेळ मिळाल्यास हेमवती रागातील बंदिशी आणि कबीर किंवा मीराबाई यांचे भजनही सादर करेन.  
- विदुषी सुमित्र गुहा

 

Web Title: Curiosity for the Sawai Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.