नव्या कुलगुरूंबद्दल उत्सुकता पोहोचली शिगेला

By admin | Published: May 11, 2017 04:32 AM2017-05-11T04:32:55+5:302017-05-11T04:47:36+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने

Curious about the new Vice-Chancellor, Shigala reached | नव्या कुलगुरूंबद्दल उत्सुकता पोहोचली शिगेला

नव्या कुलगुरूंबद्दल उत्सुकता पोहोचली शिगेला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बुधवारी २२ उमेदवारांच्या मुलाखती यशदा येथील कार्यालयामध्ये घेतल्या. समितीने ३२ उमेदवारांची यादी शॉर्ट लिस्ट केली आहे. मुलाखतींचा आज (गुरूवार) शेवटचा दिवस असून उर्वरित सर्व उमेदवारांच्या मुलाखती पार पडतील. कुलगुरू निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नव्या कुलगुरूंची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ येत्या १५ मे रोजी संपणार आहे, त्यामुळे त्यापूर्वी नवीन कुलगुरूंच्या नावाची घोषणा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. निवड समितीमध्ये अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्यासह जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार आर. यरागट्टी व सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे शोध समितीचे सदस्य आहेत. कुलगुरू पदासाठी या समितीकडे ९० उमेदवारांकडून अर्ज आले होते. या अर्जांची छाननी करून ३२ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यापैकी २० जणांच्या मुलाखती आज पार पडल्या. सकाळी साडे दहा वाजता उमेदवारांच्या मुलाखतींना सुरूवात झाली. डॉ. व्हि. बी. भिसे यांची पहिली मुलाखत झाली. प्रत्येक उमेदवाराला मुलाखतींसाठी २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. पहिल्या दहा मिनिटांमध्ये उमेदवारांनी त्यांचे प्रेन्झेंटेशन द्यायचे, त्यानंतरची दहा मिनिटे प्रश्नोत्तरे असे साधारणत: मुलाखतीचे शेडयुल्ड होते. सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेल्या मुलाखती सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत चालल्या. मुलाखत देणाºयांमध्ये बहुतांश उमेदवार हे महाराष्ट्रातीलच आहेत, त्यापैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमधील दहा उमेदवारांचा समावेश आहे. या २२ उमेदवारांच्या झाल्या मुलाखती डॉ. व्ही. बी. भिसे, प्रा. पी. जी. येवले, प्रा. एस. एस. देवकुळे, डॉ. पी. पी. कुंडल, प्रा. डी. डी. ढवळे, डॉ. एम. बी. मुळे, प्रा. व्ही. एस. सपकाळ, डॉ. के. व्ही. काळे, प्रा. अभय करंदीकर, डॉ. एस. के. ओमनवार, प्रा. व्ही. के. देशपांडे, डॉ. एम. एम. शिकारे, प्रा. ए. डी. शाळिग्राम, प्रा. अंजली क्षीरसागर, प्रा. एन. आर. कर्नाळकर, प्रा. टी. एस. एन. शास्त्री, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. एस. टी. सांगळे, डॉ. सी. एन. रावळ, प्रा. एस. आय. पाटील, प्रा. एन. एस. चौधरी, प्रा. डी. के. गौतम या २२ उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी पार पडल्या. ४कुलगुरू शोध निवड समितीने मुलाखतीसाठी बोलावलेल्या सर्व उमेदवारांच्या बायोडाटाचा तंतोतंत अभ्यास केला होता. त्यानुसार उमेदवारांना प्रश्न विचारण्यात आले. उमेदवारांचे स्पेशलायजेशन असलेल्या विषयामध्ये त्यांचे किती प्रभुत्व आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न समितीने केला. कुलगुरू पदावरील व्यक्तींना प्रशासकीय जबाबदाºया मोठ्या प्रमाणात पार पाडाव्या लागत असल्याने उमेदवारांची ती क्षमता आहे का, याचीही चाचपणी समितीकडून करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मुलाखतींचा कार्यक्रम पार पाडण्यात येत आहे.

Web Title: Curious about the new Vice-Chancellor, Shigala reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.