सध्या बीडीपीत रस्ता प्रस्तावित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:26+5:302021-03-18T04:12:26+5:30
‘प्रभाग क्र. ३२ क मध्ये गोकुळनगर पठार येथे मुख्य रस्ता डांबरीकरण करणे’ ह्या बजेट हेडखाली सुमारे १८ लाख रुपयांची ...
‘प्रभाग क्र. ३२ क मध्ये गोकुळनगर पठार येथे मुख्य रस्ता डांबरीकरण करणे’ ह्या बजेट हेडखाली सुमारे १८ लाख रुपयांची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्यावर हा रस्ता अतुलनगरपासून पुढे (बीडीपी झोन वगळून) गोकुळनगरच्या खालच्या बाजूला करणार असल्याचे मत कनिष्ठ अभियंता (पथ) रामदास आढारी यांनी व्यक्त केले. बीडीपीमध्ये कोणताही रस्ता करता येत नाही. शिवाय संबंधित ठिकाणी अनेक ठिकाणी जागादेखील ताब्यात नाहीत, त्यामुळे ह्या बहुप्रतीक्षित मुख्य रस्त्यासाठी गोकुळनगर पठारावरील नागरिकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असे चित्र आहे.
काही जागामालकांना मात्र महसूलच्या नोटिसा :
येथील सर्व्हे न. ४५ ते ७९ मधील काही जागामालकांना महसूल विभागाने फेब्रुवारी महिन्यात नोटिसा बजावल्या आहेत. मंडल अधिकारी प्रमोद भांड यांच्या सहीने येथील मारुती देवस्थान ट्रस्ट, वारजे ग्रामस्थसह इतर १७ जागमालकांना रस्त्याचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. महसूलच्या नोटिशीत सर्व्हे नंबर व गट नंबर नाही : महसुलाच्या नोटिसीला उत्तर देताना जागामालक व ट्रस्टच्या वतीने अंकुश बराटे व दत्तात्रय भिलारे यांनी या नोटीसीत सर्व्हे नंबर वा गट नंबरबाबत कोणताही उल्लेख नसल्याने कोणत्या रस्त्याबाबत किंवा नेमक्या कोणत्या जागेबाबत विचारणा होत आहे यात स्पष्टता नसल्याने याबाबत कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.