सीताफळाचे भाव २० टक्क्यांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:28+5:302021-09-27T04:10:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात संत्रा, पपई आणि पेरूच्या भावात घट झाली आहे. तर सीताफळ आणि लिंबाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डात संत्रा, पपई आणि पेरूच्या भावात घट झाली आहे. तर सीताफळ आणि लिंबाच्या भावात वाढ झाली आहे. सीताफळाच्या भावात १० ते २० टक्क्यांनी, तर लिंबाच्या भावात गोणीमागे ५० रुपयांची वाढ झाली आहे.
पेरूच्या भावात क्रेटमागे ५० ते १०० रुपये, पपईच्या भावात किलोमागे ३ ते ४ रुपयांची, तर संत्र्याच्या भावात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर मोसंबी, कलिंगड, खरबूज, अननस, चिक्कू आणि डाळिंबाचे भाव मात्र स्थिर होते.
कलिंगड तीन ते चार टेम्पो, खरबूज दोन ते तीन टेम्पो, अननस ४ ट्रक, मोसंबी ३० ते ३५ टन, संत्री २० टन, डाळिंब ४० ते ५० टन लिंबे एक ते दीड हजार गोणी, पेरू १ हजार क्रेट, चिक्कू दोन हजार बॉक्स इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :-
लिंबे (प्रति गोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन) : १५०-२२०, (४ डझन) : ८० ते १५०, संत्रा : (१० किलो) : १५०-२५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-१२०, गणेश : ५-२५, आरक्ता : १५-६०, अननस (डझन) : ७०-२७०, कलिंगड : ८-१०, खरबूज : १५-२०, पपई : ८-१८, चिक्कू ( १० किलो) १००-५५०, पेरू (२० किलो) : २००-३५०.
फोटो : मार्केट यार्डात मोसंबी, डाळिंब, बोरे आणि सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली.