कोरेगाव पार्कमधील बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पदार्फाश, सायबर सेलची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 10:22 PM2018-02-07T22:22:57+5:302018-02-07T22:23:17+5:30

अमेरिकन आयआरएस ( इंटरनल रिव्हेन्यू सर्विसेस) अधिकारी व बँकेचे वित्तीय अधिकारी असल्याची बतावणी करून हजारो अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरला गंडा घालणा-या कोरेगाव पार्क येथील इंटरनॅशनल कॉल सेंटरचा सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पदार्फाश केला.

Custody of International Call Center in Coorgaon Park, Cyber ​​Cell Action | कोरेगाव पार्कमधील बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पदार्फाश, सायबर सेलची कारवाई 

कोरेगाव पार्कमधील बनावट इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पदार्फाश, सायबर सेलची कारवाई 

Next

पुणे : अमेरिकन आयआरएस ( इंटरनल रिव्हेन्यू सर्विसेस) अधिकारी व बँकेचे वित्तीय अधिकारी असल्याची बतावणी करून हजारो अमेरिकन नागरिकांना लाखो डॉलरला गंडा घालणा-या कोरेगाव पार्क येथील इंटरनॅशनल कॉल सेंटरचा सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पदार्फाश केला. या कॉलसेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली तर त्यांच्याकडून १ लॅपटॉप, ८ संगणक हार्डडिस्क, ३ मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. 
शिवक प्रितमदा लधानी (वय २९, रा. धानोरी), प्रतिक सुभाषचंद्र पांचाल (वय ३०, रा. कोरेगाव पार्क), शेरल शतिषभाई ठाकर (वय ३३, रा. कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबतची माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. कोरेगाव पार्क येथील पिनॅकल इमारतीच्या दुस-या मजल्यावर रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कॉल सेंटर सुरु असून या कॉलसेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना फसवले जात असल्याची माहिती सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी तीन जण कॉलसेंटर चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तिघांनाही अटक करुन त्यांच्याकडून १ लॅपटॉप, ८ संगणक हार्डडिस्क, ३ मोबाईल, ८ हेडफोन व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. त्यांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 
पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांचे परराज्यातही असेच बनावट कॉलसेंटर सुरु असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन नागरिकांचा डाटा कोठून मिळत होता. याबाबत अमेरिकन नागरिक अमेरिकेच्या एफटीसी (फेडरल ट्रेड कमिशन) कडून मिळालेल्या माहितीनुसार, फसविल्या गेलेल्या अमेरिकन नागरिकांशी मेलद्वारे संपर्क साधला आहे. तसेच त्यांच्या इतर चार साथीदारांचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे. 
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदिप देशपांडे, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पवार,सहायक निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी अस्लम अत्तार, अजित कु-हे, प्रसाद पोतदार, संतोष जाधव, निलेश शेलार यांच्या पथकाने केली. 

गिफ्ट व्हाऊचर खरेदी करायला लावून फसवणूक
अमेरिकन नागरिकांचे नाव संपर्क क्रमांक पत्ता व इमेल आयडी मिळवून त्या आधारे त्या नागरिकांना कॉल सेंटरमधून बल्क व्हाईस मेल पाठविण्यात येत होते. त्यानंतर नागरिकांनी परत कॉल केल्यास आपण आरआरएस (इंटरनल रिव्हेन्यू सर्व्हिसेस) चे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्स भरणे बाकी असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर टॅक्स भरला नाही तर ६ वर्ष शिक्षा व मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली जात होती. त्यामुळे नागरिक घाबरून तडजोडीबाबत विचारत असत,  त्यासाठी त्याला जवळच्या शॉपमधून वेगवेगळ्या किंमतीचे आयट्यून, टार्गेट, वॉलमार्ट, बेस्टबाय गिफ्ट व्हाऊचर खरेदी करण्यास सांगून त्यांचा क्रमांक विचारून घेतला जात. हे नंबर गुजरातला पाठवून त्याचे भारतीय चलनात रुपांतर केले जात होते. त्यासोबतच डिसेंबर २०१७ पूर्वी पेड बँक लोन करून देण्यासाठी अमेरिकन नागरिकांना कर्ज देण्याच्या अमिषानेही ५०० ते १ हजार  डॉलरचे व्हाऊचर खरेदी करण्यास लावून कर्ज न देता फसविले जात होते. 

Web Title: Custody of International Call Center in Coorgaon Park, Cyber ​​Cell Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.