केंद्रीय सीमाशुल्क विभागाची 'मोठी कारवाई' ; ४१२ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 07:19 PM2020-10-05T19:19:56+5:302020-10-06T07:08:01+5:30

सीमाशुल्क विभागाची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

Custom department 'big action' ; 412 kg marijuana | केंद्रीय सीमाशुल्क विभागाची 'मोठी कारवाई' ; ४१२ किलो गांजा जप्त

केंद्रीय सीमाशुल्क विभागाची 'मोठी कारवाई' ; ४१२ किलो गांजा जप्त

Next
ठळक मुद्देकेंद्रीय सीमा विभागाने ट्रकसह ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त   केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाच्या सह आयुक्त

सोलापूर / पिंपरी : केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाने आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करण्याचा डाव उधळून लावला. या कारवाईमध्ये सुमारे ६५ लाख रुपये किंमतीचा ४१२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. सीमाशुल्क विभागाची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्या नुसार सीमाशुल्क विभागाने नळदुर्ग ते सोलापूर दरम्यानच्या महामार्गावर ४ ऑक्टोबरला अचानक नाकेबंदी करून वाहनांची जोरदार तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान मोठी रंग लागली होती. नाकेबंदी पासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर एक ट्रक चालू अवस्थेत ठेवून चालक पसार झाल्याचे तपासणी पथकाच्या लक्षात आले. ट्रकची तपासणी केली असता छतावर पोकळी केल्याचे लक्षात आले. या पोकळीमध्ये २०६ प्लास्टिकच्या पाकिटात ४१२ किलो गांजा आढळला. सीमाशुल्क विभागाने ट्रकसह ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. 

केंद्रीय सीमाशुल्क पुणे विभागाच्या सह आयुक्त वैशाली पतंगे-ठोंबरे म्हणाल्या, सीमाशुल्क विभागाला मिळालेल्या माहिती नुसार अचानक तपासणी करण्यात आली. तपासणी होत असल्याचे पाहताच चालक (एमएच १३, सीयू ३१९२ ) या क्रमांकाचा ट्रक चालू अवस्थेत सोडून पळून गेला. दोन महिन्यांपूर्वी सीमाशुल्क विभागाने आंध्रप्रदेशातून आलेला ८०० किलो गांजा जप्त केला होता. 

Web Title: Custom department 'big action' ; 412 kg marijuana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.