‘संजय काकडे ग्रुप’च्या ‘ले स्कायलार्क’ प्रकल्पास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:49+5:302021-03-22T04:10:49+5:30
या प्रकल्पाचा शुभारंभ १३ मार्च रोजी प्रसिद्ध डॉक्टर व रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रँट आणि प्रथम ग्राहक विजय ...
या प्रकल्पाचा शुभारंभ १३ मार्च रोजी प्रसिद्ध डॉक्टर व रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रँट आणि प्रथम ग्राहक विजय कुलकर्णी व संग्रामसिंह माळी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ‘संजय काकडे ग्रुप’चे प्रमुख संजय काकडे, संचालिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या प्रमुख उषा काकडे, कोलते पाटील ग्रुपचे प्रमुख राजेश पाटील व मिलिंद कोलते उपस्थित होते.
डेक्कनपासून १५ ते २० मिनिटांच्या तर, मुंबई-बंगळुरू महामार्गापासून पाच मिनिटांच्या अंतरावर कर्वे रस्त्यावर रस्त्यालगतच हा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या चारही बाजूंनी रस्ता आहे. विशेष म्हणजे कमर्शियल व रेसिडेन्शिअल प्रकल्प असूनदेखील दोन्हींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार दिले आहे. प्रकल्पाचे डिझाइन हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे संजय काकडे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातच हा प्रकल्प आहे. यामध्ये ‘ए’ व ‘बी’ बिल्डिंग असून त्यात २ बीएचके (९०३ स्क्वेअर फूट) व ३ बीएचके (१२१३ स्क्वेअर फूट) आणि रिटेल व्यवसायासाठी या प्रकल्पामध्ये जागा आहे. हा प्रकल्प कोथरूड-कर्वेनगर परिसरातील पहिलाच ४० मजली प्रकल्प आहे. यामधील खालचे दोन मजले रिटेल व्यवसायासाठी असून त्यावर पाच मजली पार्किंग आहे. त्यावर ३२ मजली रेसिडेन्शिअल इमारत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. पुणेकरांनी दिलेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल संजय काकडे यांनी पुणेकरांचे आभार मानले आहेत. (वा.प्र.)
फोटो : वारजे-कर्वे रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साकारत असलेल्या ‘ले स्कायलार्क’ प्रकल्पाची माहिती देताना ‘संजय काकडे ग्रुप’चे प्रमुख संजय काकडे.