इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:45 AM2017-12-02T03:45:57+5:302017-12-02T03:46:10+5:30

: फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे.

 Customers 'tria ... try' for internet speed! Complaints about running, portability and internet service to customers' trials | इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

googlenewsNext

- विशाल शिर्के
पुणे : फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
फोर-जी जमान्यात कॉलची प्राथमिक सुविधादेखील पुरेशी सक्षम नसल्याचे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. तिच अवस्था फोर-जी इंटरनेट स्पीडबाबत दिसून येत आहे. आपण फाईव्ह-जी इंटरनेट स्पीडच्या तयारीला लागलो आहोत. मात्र फोर-जी इंटरनेटचा स्पीड खरेतर किती काळ आणि कधी मिळतो हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, अशी स्थिती आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने इंटरनेट-ब्रॉडबँड संबंधीच्या तक्रारी आणि इंटरनेट स्पीड कमी असल्याच्या तक्रारी असे दोन स्वतंत्र रकाने केले आहे. त्यानुसार यावर्षी आॅक्टोबर अखेरीस एअरटेलच्या इंटरनेट सेवेबाबत तक्रार असणाºया ३२२ ग्राहकांनी अर्ज केला होता. तर इंटरनेटला खराब स्पीड असल्याचे १४५ ग्राहकांनी सांगितले होते. आयडियाच्या इंटरनेट सेवेबाबत आक्षेप घेणाºया ६२ आणि इंटरनेट खराब स्पीडबाबत २३ ग्राहक पुढे आले होते. संगणकसेवेबाबत आक्षेप घेणाºया आणि खराब इंटरनेट स्पीड असल्याच्या कारणावरून जिओच्या ४५ आणि ११७ ग्राहकांनी आणि व्होडाफोनच्या १२६ आणि ६४ जणांनी तक्रार दाखल केली होती. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी ही आकडेवारी समोर आणली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगरचे शाखा अध्यक्ष विजय सागर म्हणाले, ग्राहक पंचायतीकडे मोबाईलला इंटरनेट स्पीड नसल्याबाबत दररोज एक दूरध्वनी येतो. त्यांना भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यास सांगण्यात येते. मात्र, त्यातील दहा टक्के ग्राहकदेखील पुढे तक्रारीसाठी जात नाहीत.

इंटरनेट सेवेबाबतच्या २०१६ आणि
आॅक्टोबर २०१७ पर्यंतच्या तक्रारी

तक्रारीचा प्रकार बीएसएनएल एअरटेल आयडिया जिओ व्होडाफोन
इंटरनेट सेवा ६७/१८ ६४९/३२२ ११५/६२ ३/४५ २३४/१२६
खराब इंटरनेट १७/२० १४८/१४५ ४८/२३ ९/११७ ५२/६४
ग्राहकांची परवानगी
नसताना सेवा सुरू १३/१२ ९०/५७ ७४/७८ ०/१ १२३/१३१


पोर्टेबिलिटीला मिळेना दाद

मोबाईल क्रमांक
दुसºया कंपनीमध्ये पोर्ट करण्यासाठी कोणत्याच कंपन्या उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. नवीन मोबाईल क्रमांक सुरू करण्यासाठी केवळ आधार कार्ड दिल्यास पुरेसे ठरते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत नंबर मोबाईल कंपन्या करतात. मात्र मोबाईल क्रमांक सहजासहजी पोर्ट होत नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. आॅक्टोबर २०१७ अखेर एअरटेलच्या ८१९, आयडिया ५८९, जिओ २४ आणि व्होडाफोनच्या १ हजार २७५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षी (२०१६) देखील आयडिया ५२२ आणि व्होडाफोनच्या ८१७ तक्रारी दाखल
झाल्या होत्या.

मोबाइल कॉल ड्रॉप आणि इंटरनेट स्पीड कमी असण्याचे प्रमाण खूप आहे. मोबाइल कंपन्या दररोज १-२ जीबी डाटा मोफतच्या अनेक योजना जाहीर करते. मात्र, आपला वापर किती झाला याची नोंद करण्याची सुविधा नाही. तसेच इंटरनेटचा स्पीड मोजता येत नाही. याबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे तक्रार करूनही त्याचे उत्तर दिले जात नाही. माझ्याकडे तसा पत्रव्यवहार पडून आहे. दुसरीकडे, मोबाइल कंपन्यांचे अधिकारी ग्राहकांना दाद देत नाहीत. मग ग्राहक तक्रार करणार कोणाकडे. - विलास लेले,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोषाध्यक्ष, महाराष्ट्र

Web Title:  Customers 'tria ... try' for internet speed! Complaints about running, portability and internet service to customers' trials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.