पुणे विमानतळावर 1 कोटी 20 लाखांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:22 PM2019-01-10T12:22:01+5:302019-01-10T12:55:15+5:30

दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानातील टॉयलेटमध्ये एक किलोचे सोन्याचे ४ बार असे ४ किलो सोने तस्करी करुन आणल्याचे आढळून आले.

Customs recovers gold worth Rs 1 cr at Pune airport | पुणे विमानतळावर 1 कोटी 20 लाखांचे सोने जप्त

पुणे विमानतळावर 1 कोटी 20 लाखांचे सोने जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानातील टॉयलेटमध्ये एक किलोचे सोन्याचे ४ बार असे ४ किलो सोने तस्करी करुन आणल्याचे आढळून आले.पुणे विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी हे १ कोटी २९ लाख ४ हजार रुपयांचे हे सोने जप्त केले आहे.दुबईहून गुरुवारी पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी स्पाईस जेट फ्लाईट एस जी ५२ हे पुणे विमानतळावर उतरले.

पुणे : दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानातील टॉयलेटमध्ये एक किलोचे सोन्याचे ४ बार असे ४ किलो सोने तस्करी करुन आणल्याचे आढळून आले. पुणे विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी हे १ कोटी २९ लाख ४ हजार रुपयांचे हे सोने जप्त केले आहे.

दुबईहून गुरुवारी पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी स्पाईस जेट फ्लाईट एस जी ५२ हे पुणे विमानतळावर उतरले. हे आंतरराष्ट्रीय विमान नंतर डोमेस्टिक फ्लाईट होते. पुण्याहून ते बंगलुरुला जाते. त्यातून जाणारे प्रवासी हे स्थानिक असल्याने त्यांच्या सामानाची तपासणी बंगळुरूला उतरताना होत नाही. त्यामुळे पुण्याहून निघालेले प्रवासी विमानात लपविलेले तस्करी करुन आणलेले सोने स्वत: ताब्यात घेतात व पुढे बंगळुरू येथे उतरतात. तस्करांची ही मोडस लक्षात घेऊन दुबईहून आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानाची बाईकाईने तपासणी कस्टम अधिकारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर करतात. अशी तपासणी करीत असताना विमानातील टॉयलेटमध्ये काळ्या टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले हे चार सोन्याचे बार आढळून आले.. त्यावर परदेशी मार्क दिसून आले. कस्टम अधिकारी देशराज मिना यांना ते आढळून आले. सह आयुक्त राजेश रामाराव, उपायुक्त हर्षल मेटे, अधिक्षक सुधार अय्यर, संजय झरेकर, सतीश सांगळे, राजेंद्र प्रसाद मिना, जी. जे. जोशी, बी. एस. हगावणे, एस. एस. निंबाळकर आणि ए. ए. भट यांचा पथकाने हे सोने ताब्यात घेऊन जप्त केले आहे. यापूर्वी दुबई, आबुदाबी हून येणाºया आंतरराष्ट्रीय फ्लाईट व पुढे ज्या डोमेस्टिक फ्लाईट होतात. त्यातील टॉयलेटमध्ये, सीटखालील रेक्झीनमध्ये सोने लपवून आणण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Web Title: Customs recovers gold worth Rs 1 cr at Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.