WhatsApp ग्रुपमधून काढून टाकले म्हणून कापली जीभ; फुरसुंगी भागातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:11 PM2023-01-03T16:11:57+5:302023-01-03T16:15:45+5:30
आरोपीने इतरांना बोलावून किरकोळ कारणावरून मारहाण सुद्धा केली
पुणे : पुण्याच्या फुरसुंगी भागात व्हाट्सअप ग्रुप मधून टाकल्याच्या वादातून एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याची धक्कदायक घटना घडली आहे. किरण हरपळे असे जीभ कापलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रीती किरण हरपळे (वय-38) यांनी याबाबत हडपसरपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 28 डिसेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारस घडला आहे. पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीत ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे. तक्रारदार प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्षा आहेत. तक्रारदार व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. सुरेश पोकळे यांनी हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना व्हाटॅसअपवरुन 'ओम हाईटस ऑपरेशन' या ग्रुप मधून रिमुव्ह का केले आहे? असा मेसेज केला. परंतु त्यास हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे पोकळे स्वतःहून हरपळे यांना भेटण्यास त्यांच्या ऑफिसमध्ये गेले.
पोकळे याने हरपळे यांना ग्रुपमधून काढून टाकल्याचा जाब विचारला. त्यावर ग्रुपमध्ये कोणीही कसलेली मेसेज टाकत आहे, त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे हरपळे यांनी सांगितले. त्यावर पोकळे याने त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या तोंडावर ठोसा मारुन इतर आरोपींना सदर ठिकाणी किरण हरपळे यांना मारहाण करुन जखमी केले. यामध्ये त्यांची जीभच कापली गेली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके पुढील तपास करत आहे.