अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:53+5:302021-08-12T04:13:53+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाठी गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदाही ...
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाठी गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदाही ऑनलाईन प्रवेश दिले जाणार असून, त्यासाठी येत्या १६ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासन निर्णयानुसार प्रथम सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जाणार होती. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. परंतु, आता केवळ दहावीच्या गुणांवर प्रवेश दिले जाणार असल्याने प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-----------------
पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका परिसरातील मागील वर्षाची प्रवेशाची आकडेवारी
महाविद्यालयांची संख्या -३०४
प्रवेश क्षमता - १,०७,२१५
मागील वर्षी झालेले प्रवेश - ७१,७२२
रिक्त राहिलेल्या जागा - ३५,४९३
---------------
न्यायालयाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवावी लागेल. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेशासाठी सर्वसाधारण विद्यार्थी व गुणवत्तापूर्ण विद्यार्थी अर्ज करतात. परंतु, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळतो. शासन निर्देशानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
- रवींद्रसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज
-----------------------
सीईटी परीक्षा रद्द झाल्याने सुमारे १५ दिवस अकरावीचे प्रवेश लवकर होतील. मात्र, एकाच गुणांचे एकापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी आले तर अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला याबाबत काही नियम करावे लागतील.
- राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर
-----------