गंडा घालण्यासाठी सायबर चोरट्यांनी लढवली अफलातून आयडिया; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:13 PM2021-10-21T15:13:48+5:302021-10-21T15:17:45+5:30
पुणे : मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहारामुळे सायब क्राईम आता प्रत्येकाशी निगडीत विषय झाला आहे. लोकांना गंडविण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या ...
पुणे: मोबाईल आणि ऑनलाईन व्यवहारामुळे सायब क्राईम आता प्रत्येकाशी निगडीत विषय झाला आहे. लोकांना गंडविण्यासाठी सायबर चोरटे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. यापूर्वी मैत्री करुन परदेशातून गिफ्ट पाठविल्याचे भासवून कस्टमने आडविल्याचे सांगून ते सोडवून घेण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्याचे असंख्य प्रकार घडले आहेत. आता एका चित्रकाराला चक्क चेक कस्टमने अडविल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तब्बल ८० हजार रुपयांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी पर्वती येथे राहणाऱ्या एका ५४ वर्षाच्या चित्रकाराने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चित्रकार असून ते पर्वती पायथा येथे राहतात. पायल पाठल असे नाव सांगणाऱ्या एका महिलेचा त्यांना १ मे २०२० रोजी ई मेल आला होता. त्यात त्यांना एक फोटो दाखवून पेंटिंग काढायचे असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्यांच्या नावाने तामिळनाडु मर्कटाईन बँकेचा एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपयांचा चेक काढण्यात आला. या चेकचा फोटो त्यांना दुसऱ्या दिवशी पाठविण्यात आला. त्यानंतर केल्विन ग्रे नाव सांगणाऱ्याने त्यांना फोन करुन चेक कस्टम विभागात अडकला असून तो सोडविण्यासाठी त्यांना वेळोवेळी पैसे भरण्यास सांगण्यात आले.
१ लाख २८ हजार ५०० रुपयांच्या चेकच्या फोटोवर विश्वास ठेवून या चित्रकाराने तब्बल ८० हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याचा प्राथमिक तपास होऊन आता तो दत्तवाडीत गुन्हा दाखल झाला आहे