खेड प्रांत कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू, जमीन संपादन प्रक्रियेला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:01+5:302021-06-30T04:08:01+5:30
१२ गावांपैकी रोज एका गावातील किमान पाच शेतकरी पुढील चार दिवस रोज ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत. तालुक्यातील १२ गावांतून ...
१२ गावांपैकी रोज एका गावातील किमान पाच शेतकरी पुढील चार दिवस रोज ज्ञानेश्वरी वाचन करणार आहेत. तालुक्यातील १२ गावांतून पुणे-नाशिक रेल्वे आणि रिंगरोड प्रकल्प होणार आहे. खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, आळंदी, चऱ्होली, चिंबळी, केळगाव, मरकळ, धानोरे, सोळू, गोलेगाव या गावांचा समावेश आहे. रेल्वे मार्गासाठी ५० ते ८० मीटर आणि रिंगरोडसाठी सर्रासपणे ११० मीटर अशी एकूण ५८६ हेक्टर जमीन संपादित होणार आहे. सर्व गावांतील शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध आहे. अनेकजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. जमिनी संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आंदोलनात खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी, कल्पना गवारी, अनिता शेळके, सचिन येळवंडे, दत्तात्रय वरपे, रवी कुऱ्हाडे, राहुल शिंदे, पंडित गोडसे, हरिभाऊ खांदवे, बापू कुऱ्हाडे, दिलीप शेळके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो ओळ : रिंगरोड आणि पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी जमीन संपादनाला विरोध दर्शवित शेतकरी प्रांत कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी वाचन करीत चक्री उपोषणाला बसले आहेत.