विद्यापीठात आजपासून सायकल शेअरिंग, महापौरांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:26 AM2017-12-05T07:26:19+5:302017-12-05T07:27:21+5:30
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्यापासून (मंगळवार) सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाबरोबरच औंध परिसरामध्येही ही सेवा उपलब्ध असणार आहे.
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्यापासून (मंगळवार) सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाबरोबरच औंध परिसरामध्येही ही सेवा उपलब्ध असणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सायकल शेअरिंग योजनेअंतर्गत औंध परिसरात २०० आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठात १०० सायकली प्रायोगिक तत्त्वावर ठेवण्यात येणार आहेत. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर पुढील तीन महिन्यांसाठी राबवली जाणार आहे. साधारण ३० मिनिटांसाठी १ रुपया भाडे आकारण्यात येणार आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन स्मार्ट सिटी आणि संपूर्ण शहरात ही योजना राबविली जाईल. या योजनेंतर्गत वापरल्या जाणाºया प्रत्येक सायकलला बारकोड लावण्यात आले आहे. यासाठी पेटीएमच्या माध्यमातून हे पैसे भरता येणार आहे. सध्या औंधमध्ये १० ठिकाणी व विद्यापीठात ९ ठिकाणी सायकल घेऊन जाण्यासाठी व नेण्यासाठी जागा करण्यात आल्या आहेत. औंधमध्ये एक सायकल मार्गही तयार करण्यात आला आहे. सायकल मार्गाची रचना कशी असावी व त्याचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी हा मार्ग पथदर्शी ठरणार आहे.