पर्यावरण रक्षणासाठी सायकलभ्रमंती

By admin | Published: November 9, 2016 09:32 PM2016-11-09T21:32:14+5:302016-11-09T22:25:12+5:30

पुणे येथील ६० जणांची टीम : पुणे-गोवा पाच दिवसांत पादाक्रांत; इंधन बचतीचाही संदेश

Cyclic scandal for environmental protection | पर्यावरण रक्षणासाठी सायकलभ्रमंती

पर्यावरण रक्षणासाठी सायकलभ्रमंती

Next

मालवण : पुणे येथील ६० जणांच्या ग्रुपने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुणे ते गोवा असा सायकल प्रवास सुरू केला आहे. हा ग्रुप मालवण येथे मंगळवारी दाखल झाला. यावेळी ग्रुपप्रमुख डीमेश पटेल (मुंबई) यांनी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते, ते रोखण्यासाठी वाहनांच्या कमी संख्येबरोबर प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकल प्रवास केला पाहिजे, असे सांगितले. इंधन बचतीबरोबरच पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा संदेश देण्यासाठी हा पुणे-गोवा सायकल प्रवास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या दहा वर्षांपासून कोकण, गोवा सफर होत असून, अगदी ७० वर्षांचे वयोवृद्धही यात सहभागी झाले आहेत. पुणे येथून या सायकल सफरीने कोकण किनारपट्टीवर प्रवास सुरू केला असून, मालवण दर्शन झाल्यानंतर हा ग्रुप वेंगुर्ले येथे जाईल. त्यानंतर गोवा येथे या सायकल प्रवासाची सांगता होणार आहे. पाच दिवसांचा हा सायकल प्रवास आपल्यासाठी नेहमीच अविस्मरणीय असा ठरतो, अशाही भावना सहभागी सायकलस्वारांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

सात महिला सदस्यांचा सहभाग
पुणे, मुंबईसह औरंगाबाद व नाशिक येथील सदस्य यात सहभागी झाले आहेत. या ग्रुपमध्ये दहा वर्षे वयोगटातील दोन मुले, सात महिला, तर ५० पुरुष आहेत. गेली पाच वर्षे या ग्रुपच्यावतीने दिवाळी सुटीच्या कालावधीत पाच दिवसांसाठी हा सायकल प्रवास निश्चित केला जातो. पुणे, महाड, गुहागर, पावस, कुणकेश्वर, मिठबांव, मालवण असा प्रवास चार दिवसांत पूर्ण केला आहे. प्रवासात ६९ वर्षीय एअरफोर्सचे सेवानिवृत्त वैमानिक यांचाही समावेश आहे. विविध शासकीय सेवेत, तसेच मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले सदस्य यात सहभागी होतात.

गोवा येथे समारोप
गेल्या दहा वर्षांपासून कोकण, गोवा सफर होत असून, अगदी ७० वर्षांचे वयोवृद्धही यात सहभागी झाले आहेत. पुणे येथून या सायकल सफरीने कोकण किनारपट्टीवर प्रवास सुरु केला असून, मालवण दर्शन झाल्यानंतर हा ग्रुप वेंगुर्ले येथे जाईल. त्यानंतर गोवा येथे प्रवासाची सांगता होणार आहे.

Web Title: Cyclic scandal for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.