चक्री वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:38+5:302021-05-18T04:11:38+5:30

तौक्ते चक्री वादळ महूडे : तौक्ते चक्री वाद‌ळामुळे महावितरण कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. या चक्री वादळामुळे नांद येथे ...

Cyclone blow | चक्री वादळाचा फटका

चक्री वादळाचा फटका

Next

तौक्ते चक्री वादळ

महूडे : तौक्ते चक्री वाद‌ळामुळे महावितरण कंपनीला चांगलाच फटका बसला आहे. या चक्री वादळामुळे नांद येथे झाडे मोडून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेवर पडल्यामुळे तारा तुटल्यामुळे नांद गावचा विद्युतपुरवठा खंडित झाला.

तौक्ते वादळाचा फटका भोर तालुक्याला बसला असून काल सकाळ पासूनच वारे जोराने वाहत होते. दुपार नंतर मात्र पाऊसाने रिमझिम सुरुवात केली. त्यांनतर वारा व पाऊस जोर धरू लागल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, वीटभट्टी चालकांना ही याचा फटका बसला आहे.

भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यासाठी गोळा करून ठेवलेला जनावरांचा चारा पाऊसाने भिजला आहे. वीटभट्टी वरील विटा पाऊसाने भिजून जाऊ नये म्हणून ताडपत्रीने झाकून ठेवले होते, परंतु वारे जोराचे असल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही तयार केलेला कच्चा माल पाऊसाने भिजून खराब झाला त्यामध्ये वीटभट्टी मालकांचे लाखो रुपये चा फटका बसला आहे.

नांद येथे जोरदार वाऱ्यामुळे झाड मोडून पडले असल्याने विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या. त्यामुळे नांद येथील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. तेथील ग्रामस्थांनी ते झाड तोडून बाजूला काढले व वाहतुकीस रस्ता खुला करण्यात आला. आहे अगोदरच कोरोनाचे संकट असताना त्यामध्ये वादळीवारे, पाऊस यामुळे याची आपत्कालीन स्थिती ओढविल्याने महावितरणचे सर्वच कर्मचाऱ्यांचे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आसल्याचे सगण्यात येत आहे.

--

फोटो : १७महुडे तौक्ते वादळ

फोटो - विद्युत प्ररवठा करणाऱ्या तारा वादळी वाऱ्यामळे तुटलेल्या विजवाहक तारा

Web Title: Cyclone blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.