सिलिंडर मुबलक, पण विनाअनुदानीत

By admin | Published: July 7, 2015 05:08 AM2015-07-07T05:08:33+5:302015-07-07T05:08:33+5:30

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना यंदा विनाअनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

Cylinders abundant, but nonstop | सिलिंडर मुबलक, पण विनाअनुदानीत

सिलिंडर मुबलक, पण विनाअनुदानीत

Next

पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना यंदा विनाअनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.
केंद्र शासनाने अनुदानित गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ३० जूनपर्यंत गॅस सिलिंडर बँक लिकींग करण्याची अखेरची मुदत दिली होती. पुणे, सातार, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिंड्याच्या मालकांनी अशा प्रकारे गॅस बँक लिकींग केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दिंड्यांना आता ६३९ रुपयांनी गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. हा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्याचे आदेश सर्व गॅस कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी दिली.
यंदा पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सुमारे ६०० पेक्षा अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील दिंड्या पंधरा दिवसांसाठी २३ हजार गॅस सिलिंडर, सातारा जिल्ह्यासाठी २६ हजार गॅस सिलिंडर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी १६ हजार गॅस सिलिंडर लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु, यातील अनेक ंिदंड्यांच्या मालकांनी आपले सिलिंडर ३० जूनपर्यंत बँक लिकिंग केलेर नाही. ज्यांनी बँक लिकींग केले आहे, त्याअनाचा सध्या शासनाच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो. यामुळे या सर्व दिंड्यांना एका
सिलिंडरमागे सुमारे १९० रुपयांचा भुर्दंड पडणार आहे. (प्रतिनिधी)

रॉकेलचा पुरवठा करण्याचे दुकानदारांना आदेश
शासनाकडे वेळोवेळी मागणी करुन देखील पालखी सोहळ््यासाठी स्वतंत्र रॉकेलचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष नियोजन करुन येणाऱ्या कोट्यातून पालखी सोहळ््यात सहभागी दिंड्यांना रॉकलेचा पुरवठा केला जातो. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दिंड्यांना सुमारे २ हजार ५२ लिटर रॉकलची मागणी असून, हा पुरवठा करण्याचे आदेश सर्व संबंधित रॉकेल दुकानदारांना देण्यात आले आहेत.


असे मिळणार गॅस सिलिंडर
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या विनाअनुदानित म्हणजे ६३९ रुपये व प्रत्येक गॅस सिलिंडर साठी स्वतंत्र १४५० रुपये डिपॉझिट असे एकूण २०८९ रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये ज्या दिड्यांनी बँक लिकींग केले आहे त्यांना शासनाचे ११९ रुपये अनुदान पुन्हा मिळणार आहे.

Web Title: Cylinders abundant, but nonstop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.