सिलिंडर नाकारले

By admin | Published: November 10, 2016 02:11 AM2016-11-10T02:11:41+5:302016-11-10T02:11:41+5:30

केंद्र स्तरावर अचानक घेण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनात राहणार नसल्याच्या निर्णयाचा फटका जनसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला.

The cylinders were rejected | सिलिंडर नाकारले

सिलिंडर नाकारले

Next

पुणे : केंद्र स्तरावर अचानक घेण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनात राहणार नसल्याच्या निर्णयाचा फटका जनसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. दैनंदिन वापरातील एलपीजी गॅस आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना सुटे पैसे नसल्याच्या कारणावरून गॅस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना गॅस न घेताच घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
गॅससाठी नंबर लावल्यानंतर काही दिवसांनी गॅस सिलिंडर घरी येतो.
मात्र, दुसरीकडे शहरातील सर्व वितरकांना नागरिकांनी ५०० किंवा १००० रुपयांची नोट दिल्यास ती स्वीकारा, असे संघटनेकडून सांगण्यात आल्याचे एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्ष उषा पूनावाला म्हणाल्या. आमच्याकडे नोंदणी असणाऱ्या १५० एलपीजी वितरकांना आम्हीही अशी विनंती केली आहे.
गॅस सिलिंडरची किंमत ४७० रुपये इतकी आहे. सामान्य व्यक्ती ५०० किंवा १००० रुपयांची नोट देण्याची शक्यता असते; मात्र गॅस वितरकांकडून येणारे कर्मचारीही नोट घेण्यास नकार देत आहेत. मात्र, कर्मचारीही इतके सुटे पैसे एका दिवसात कुठून आणणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी लोक सुटे पैसेही देतात, मात्र आज अचानक ५०० आणि हजार रुपयांच्या नोटाच लोक पुढे करत असल्याचे चित्र असल्याचे एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या अध्यक्ष उषा पूनावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The cylinders were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.