डी. एस. कुलकर्णी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 04:47 PM2018-03-01T16:47:40+5:302018-03-01T16:47:40+5:30
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.
डीएसके यांना 1 मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. डीएसके यांनी ठेवीदारांची फसवणूक केली असून त्यांनी हा गंभीर गुन्हा आहे. त्यांच्या 7 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तपासात प्रगती आहे. त्यांच्याकडून आणखीन खूप माहिती घेणे बाकी आहे, त्यामुळे त्याना अजून 2 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. आरोपीच्या वतीने त्याला विरोध केला गेला. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. आरोपीच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला असून त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांची येरवडा कारागृहात रवानगी न करता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची परवानगी द्यावी, असा एक अर्ज केला आहे.
वैदकीय उपचारासाठी 3 आठवड्याचा तात्पुरता जामीन मंजूर करावा असा दुसरा अर्ज करण्यात आला आहे, त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागवले असून त्याची सुनावणी काही वेळाने होणार आहे.