डेंगीच्या भीतीने आंबळे स्वच्छ
By admin | Published: November 22, 2014 11:41 PM2014-11-22T23:41:08+5:302014-11-22T23:41:08+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे जिल्हा परिषदेने कळविल्याने पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभागाची तारांबळ उडाली.
Next
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील आंबळे येथे डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे जिल्हा परिषदेने कळविल्याने पुरंदर तालुक्यातील आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. गाव स्वच्छ झाले खरे; पण डेंगीसदृश गाव पुरंदर तालुक्यातील नसल्याचे समजताच सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुणो जिल्हा परिषदेने आंबळे गावात डेंगीसदृश परिस्थिती असल्याचे कळवल्याने पुरंदर तालुका आरोग्य विभागाची तारांबळ उडाली. प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस, पंचायत समिती पुरंदर, आंबळे ग्रामपंचायत, अंगणवाडीसेविका यांनी आंबळे गावात धाव घेतली. आरोग्य कर्मचा:यांच्या मार्फत गाव व वाडीवस्तीवरील घरांना भेटी देण्यात आल्या. घरात असणा:या आजारी रुग्णांची तपासणी मोहीम राबवण्यात आली.
घरोघरी कंटेनेर सव्र्हे करून डास उत्पत्ती स्थानाची शोधमोहीम राबवण्यात आली. घरोघरी तापाची रुग्ण तपासणी व जागीच उपचार करण्यात आला. तापसंबंधित रुग्णाचे रक्तनमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
गावात ग्रामसभेचे आयोजन करून डेंगीसंदर्भात जनजागृती करण्यात आली. कीटकजन्य आजारापासून बचाव करण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणो जैवप्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत गावातील सर्व डास उत्पत्ती तसेच कायमस्वरूपी पाणीसाठय़ात गप्पी मासे सोडण्यात आले.
उघडय़ावरील व वापरात नसलेल्या पाणीसाठय़ात र्निजतुकीकरण करून डास आळी मारण्याकरिता रेमिफोस औषध टाकण्यात आले. गावातील घरामध्ये मशीनद्वारे धुरळणी करण्यात आली.
(वार्ताहर)
4 रांजणगाव गणपती : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विद्या विकास मंदिर शाळेला कनिष्ठ महाविद्यालयाच्या 2 माजी विद्याथ्र्यानी पेग्विनच्या आकाराच्या सहा हजार रुपये किमतीच्या एकूण 3 कचराकुंडय़ा भेट देऊन शालेय स्तरापासून सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला हातभार लावून शाळेच्या
ऋ णात राहणो पंसत केले.
4रांजणगाव गणपती येथील युवा उदयोजक मोहनशेठ लांडे व संपतशेठ शेळके या दोन मित्रंनी एकत्रितरित्या शाळेची गरज व स्वच्छतेचे महत्व ओळखून पेग्वीनच्या आकाराच्या आकर्षक तिन कचरा कुडंया शाळेला भेट देऊन शाळेबददलची आस्था दाखविली.
413 ते 14 वर्षापूर्वी कनिष्ठ महाविदयालयात असतांना एकाच सायकलवर येणारे हे दोघेजण आज उच्च किंमतीच्या चारचाकीत शाळेत आल्याने शिक्षकांनाही त्यांचा अभिमान वाटला. संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी या विदयाथ्र्यांचे कौतुक केले तर विदयालयाचे प्राचार्य दिलिप पवार व पर्यवेक्षक हरिदास आटोळे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला.