बापरे! पुण्यातील आरटीओ 'अंधारात', थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित; कामकाज पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:49 PM2021-07-15T18:49:24+5:302021-07-15T18:49:31+5:30

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकवले

Dad! RTO in Pune in 'darkness', power outage due to arrears; Completely jammed | बापरे! पुण्यातील आरटीओ 'अंधारात', थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित; कामकाज पूर्णपणे ठप्प

बापरे! पुण्यातील आरटीओ 'अंधारात', थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित; कामकाज पूर्णपणे ठप्प

Next
ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज हे जनरेटर वर होता. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाले असल्याचे नाही आले लक्षात

पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जवळपास साडे बारा लाख रुपयांचे वीज बिल थकविले असल्याने एमएसइबी ने पुणे आरटीओ कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गुरुवारी आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. 

गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज हे जनरेटर वर होत होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाले असल्याचे लक्षात आले नाही. मात्र गुरुवारी दुपारी जनरेटर मध्ये देखील बिघाड झाल्याने आरटीओ कार्यालयात अंधार दाटला. आणि एमएसइबी ने कारवाई केल्याचे लक्षात आले. पुणे आरटीओ कार्यालयाने ही बाब वरिष्ठच्या निदर्शनास आणून दिली आहे.मात्र थकबाकी ची काही रक्कम भरल्यानंतरच वीज पुरवठा पुर्ववत होणार आहे.

''जवळपास साडे बार लाख रूपयाचे बिल थकले असल्याने एमएसइबी ने ही कारवाई केली. आम्ही हे शासनाच्या निदर्शनास आणून दिलो आहोत. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. असे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ अजित शिंदे यांनी संगितले आहे''. 

Web Title: Dad! RTO in Pune in 'darkness', power outage due to arrears; Completely jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.