देश समाजकारण्यांमुळे चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:49 AM2017-07-31T04:49:02+5:302017-07-31T04:49:02+5:30

राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे

daesa-samaajakaaranayaanmaulae-caalatao | देश समाजकारण्यांमुळे चालतो

देश समाजकारण्यांमुळे चालतो

Next

पुणे : राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
‘लायन्स क्लब पुणे औंध-पाषाण’चे नूतन अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. या वेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह, मावळते अध्यक्ष डॉ. प्रदीप दामले, सचिव गणेश जाधव, प्रदीप बर्गे, गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, ‘‘माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसºयाला मदत करण्याची भावना, संस्कार निर्माण करणे हे लायन्सचे यश आहे. लायन्सचे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे. लायन्स क्लबने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे, पुढील काळात युवा नेतृत्व घडणाची जबाबदारी लायन्सने घ्यावी.’’
लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण’ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी दिली. लायन्सच्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्ये केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेठ यांनी आभार मानले. विनोद शाह, कृष्णकांत कुदळे, अंकुश काकडे, अरुण शेवते, प्रकाश देवळे, मिलिंद जोशी, रवी चौधरी, सुरेश धर्मावत, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: daesa-samaajakaaranayaanmaulae-caalatao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.