अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 09:35 AM2021-02-27T09:35:34+5:302021-02-27T09:37:52+5:30

चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

Dagdusheth Ganpati temple will be closed on Angarki Chaturthi due to increasing corona cases | अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी

अंगारकी चतुर्थीला 'दगडूशेठ' गणपती मंदिर दर्शनासाठी बंद; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी

Next

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला (मंगळवार, दि.२ मार्च) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
 
अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
 
अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
 
घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मंदिरात खबरदारी म्हणून सर्व सुविधा; हार, नारळ स्वीकारणे बंद
पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्विकारणे बंद केले आहे. तसेच येणा-या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे.

Read in English

Web Title: Dagdusheth Ganpati temple will be closed on Angarki Chaturthi due to increasing corona cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.