PM Modi Pune Visit: दगडूशेठचे दर्शन.. पुरस्कार सोहळा.., असा असेल PM नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 06:41 PM2023-07-30T18:41:07+5:302023-07-30T18:42:29+5:30

पंतप्रधान मंगळवारी सकाळी ११ वाजता दगडूशेठच्या बाप्पांचे दर्शन घेऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार

Dagdusheth's darshan.. Awards presentation.., this will be Prime Minister Narendra Modi's visit to Pune | PM Modi Pune Visit: दगडूशेठचे दर्शन.. पुरस्कार सोहळा.., असा असेल PM नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

PM Modi Pune Visit: दगडूशेठचे दर्शन.. पुरस्कार सोहळा.., असा असेल PM नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मंगळवारी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२:४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा १ च्या कार्य पूर्ण झालेल्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २.५ लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल.

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Dagdusheth's darshan.. Awards presentation.., this will be Prime Minister Narendra Modi's visit to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.