दगडखाण कामगारांच्या मुलांनी फोडली दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:33+5:302021-09-02T04:20:33+5:30

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक ...

Dahihandi smashed by children of stone miners | दगडखाण कामगारांच्या मुलांनी फोडली दहीहंडी

दगडखाण कामगारांच्या मुलांनी फोडली दहीहंडी

Next

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ स्वाध्यायी संध्या झरकर यांच्या हस्ते एकलव्य संस्थेतील गंगूबाई कांदेकर यांचा यशोदा माता सन्मान देऊन गौरवही करण्यात आला. साडीचोळी, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते. कार्यक्रमाला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे, ओंकार शिंदे, ओंकार चिकणे, हर्ष येळापुरे, सुरेश तरलगट्टी उपस्थित होते. पारंपरिक वेशात चिमुकले कोविडविषयी सर्व नियम पाळून उत्सवात सहभागी झाले होते.

संतुलन पाषाण संस्थेला धान्यरूपी गोपाळकाला मदत म्हणून देण्यात आला. शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या स्मरणार्थ स्वरगोकुळ हा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विरासत की महिमा हा संजय गरुड यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. पंडित शिवदास देगलूरकर, रोहन शेटे, माऊली फाटक, संकेत फाटक यांनी साथसंगत केली. समस्त नामदेव शिंपी दैव मंडळ कसबा पेठ, मॉडर्न कॉलेज आॅफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स (डब्ल्यू.सी.बी.एस.), श्री दत्त आनंद परिवार यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.

फोटो - गोपालकाला -१ , कांदेकर पुरस्कार

फोटो ओळ : कसबा पेठेतील अमेय सोसायटीच्या आवारात दहीहंडी फोडताना खराडी येथील संतुलन पाषाण या संस्थेतील दगडखाण कामगारांची मुले. दुसऱ्या छायाचित्रात माता यशोदा सन्मान स्वीकारताना गंगूबाई कांदेकर.

Web Title: Dahihandi smashed by children of stone miners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.