शहरातील कचऱ्याचे दैनंदिन ‘ऑडिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:32+5:302021-05-05T04:19:32+5:30

पुणे : संपूर्ण शहरामधून नेमका किती कचरा उचलला जातो, याच्या नोंदी ठेवण्यात अचूकता येण्यासाठी तसेच सर्व रॅम्प, कचरा प्रकल्पांमध्ये ...

Daily ‘audit’ of city waste | शहरातील कचऱ्याचे दैनंदिन ‘ऑडिट’

शहरातील कचऱ्याचे दैनंदिन ‘ऑडिट’

googlenewsNext

पुणे : संपूर्ण शहरामधून नेमका किती कचरा उचलला जातो, याच्या नोंदी ठेवण्यात अचूकता येण्यासाठी तसेच सर्व रॅम्प, कचरा प्रकल्पांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्याद्वारे शहरातील कचऱ्याचे ऑडिट करणे सोपे आणि अधिक पारदर्शक होणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कचऱ्याच्या नोंदीपासून प्रक्रिया प्रकल्प, शेतकऱ्यांना देण्यात येणारा ओला कचरा, रिजेक्टच्या नोंदींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरणाचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. कचऱ्याचे स्वतंत्र मोजमाप करण्यासाठी आणि त्याच्या नोंदी करण्यासाठी सर्व रॅम्प आणि प्रक्रिया प्रकल्प संगणकांनी ऑनलाईन जोडण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले असून, त्यावर तातडीने नोंद करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ॲपमुळे अपडेट होणाऱ्या नोंदी अधिकाऱ्यांना अगदी मोबाईलवरही पाहता येणार असल्याचे व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपआयुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.

-----

शहरात दररोज दोन हजार टन ओला व सुका कचरा निर्माण होतो. शहराच्या लोकसंख्येचे प्रमाण, विविध रॅम्प व प्रकल्पांवरील नोंदीवरून कचऱ्याचे प्रमाण निश्‍चित करण्यात येत होते. या नोंदीचा वापर अगदी न्यायालयात देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रापासून, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा, पर्यावरण अहवाल आणि अगदी अंदाजपत्रक तयार करताना करण्यात येत आहे.

-----

कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची धाव, कंत्राटी कामगारांची नेमणूक, प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी यामधील त्रुटी वेळोवेळी समोर आल्या आहे. कचरा निर्मूलनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोपही अनेकदा झालेले आहेत.

Web Title: Daily ‘audit’ of city waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.