रोजची सोनेरी जेजुरी रंगीबेरंगी, खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:08+5:302021-04-03T04:09:08+5:30

जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून अनोखी पूजा-अभिषेक करण्यात ...

The daily golden jury is colorful, Khanderaya's Rangpanchami is celebrated with great reverence | रोजची सोनेरी जेजुरी रंगीबेरंगी, खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी

रोजची सोनेरी जेजुरी रंगीबेरंगी, खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी

Next

जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून अनोखी पूजा-अभिषेक करण्यात आला. भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि बहुजन बांधवांचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा -यात्रा ,सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातूनच बहुरंगी -बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते. याच सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली.

पहाटेची भूपाळी पूजा-अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात येऊन देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली होती. देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आले आणि रोज पिवळी होणारी जेजुरी आज वेगळं वेगळ्या रंगात बुडालेली दिसली.

कोविडमुळे मर्यादा आलेल्या जेजुरीगडावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ही आज रंगपंचमी सण मार्तंडभैरवाच्या साक्षीने साजरा केला.

.

जेजुरी गडावरील मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींना रंगपंचमीनिमित्त विविध रंगांनी सजवण्यात आले होते.

Web Title: The daily golden jury is colorful, Khanderaya's Rangpanchami is celebrated with great reverence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.