महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांचे दररोज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:32 AM2020-12-04T04:32:00+5:302020-12-04T04:32:00+5:30

पुणे : महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये आता दररोज बीसीजी, डीपीटी, पोलिओसह १० लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे़ यामुळे कोरोनाच्या ...

Daily vaccination of children in all municipal hospitals | महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांचे दररोज लसीकरण

महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांचे दररोज लसीकरण

Next

पुणे : महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये आता दररोज बीसीजी, डीपीटी, पोलिओसह १० लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे़ यामुळे कोरोनाच्या काळात ज्या बालकांना लसीकरण झाले नाही त्यांना आता दररोज ही सेवा मिळणार आहे़

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ. अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली़ पुणे महापालिकेच्या रूग्णालयांत नवजात बालकांसह वय वर्षे १६ पर्यंतच्या मुलांना विविध प्रकारच्या १० लसी टप्प्या-टप्प्याने दिल्या जातात़

प्रारंभी ही सुविधा नारायण पेठेतील भावे रूग्णालय वगळता अन्य रूग्णालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस सुरू होती़ मात्र नोव्हेंबर,२०१९ पासून भावे रूग्णालयासह कमला नेहरू रूग्णालय, राजीव गांधी रूग्णालय येथे दररोज लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली़ उर्वरित रूग्णालयांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस उपलब्ध होती़

चौकट

या लसी उपलब्ध

कोरोना आपत्तीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व महापालिकेची बहुतांशी रूग्णालये ही कोविड-१९ च्या रूग्णांसाठी राखीव केल्याने, मध्यतंरीच्या काळात या लसीकरण सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हत्या़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शहरातील सर्वच म्हणजे ६५ रूग्णालयांमध्ये आता दररोज पोलिओ, बीसीजी, बेंटा, आयपीव्ही, रोटा, एम़एस़आर, डीपीटी, टीडीसह दहा लसीकरण उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले़

------------------------------------------

Web Title: Daily vaccination of children in all municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.