रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:53 PM2019-07-09T17:53:05+5:302019-07-09T17:53:59+5:30

प्लास्टिक बंदी लागू करताना दूध व्यावसायिकांनी विक्री केल्या दूध पिशव्या पुन्हा संकलित करण्याची अट घातली आहे.

Dairy owners' warning of selling milk on the road | रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा

रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा

Next
ठळक मुद्देदूध पिशवी संकलनाला विरोध : सक्ती केल्यास सुट्टे दूध विक्री करण्याचा निर्णय

पुणे : प्लास्टिक बंदी लागू करताना दूध व्यावसायिकांनी विक्री केल्या दूध पिशव्या पुन्हा संकलित करण्याची अट घातली आहे. मात्र, व्यावसायिकांना विक्री केलेल्या पिशव्या संकलित करणे अडचणीचे आहे. सरकारने त्यावर योग्य पर्याय उपलब्ध करुन न दिल्यास ३० जुलै पासून दुग्ध व्यावसायिक शहरातील रस्त्यांवर बसून सुट्ट्या दुधाची विक्री करतील, असा इशारा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दिला आहे.
प्लास्टिक बंदी, दुधाच्या प्लास्टिक पिशव्या व प्रक्रिया, दुग्ध व्यावसायिकांचे थकीत अनुदान अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दूध संघाची सोमवारी पुण्यातील एका हॉटेलमधे बैठक झाली. त्यात ४६ डेअरींचे ७५ प्रतिनिधी आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाºया कंपनीचे प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. 
आधीच दुग्ध व्यवसाय अडचणीतून जात आहे. या उद्योगाला मदत करण्याऐवजी दुधाच्या प्लास्टिक पिशवीवर निर्बंध घालून सरकार या अडचणीत वाढ  करीत आहे. ग्राहकांना विकलेल्या दुधाच्या पिशव्य पुन्हा संकलित करणे व्यवहारिकदृष्ट्या शक्य नाही. जर, प्लास्टिक पिशवी बंद झाल्यास ग्राहकांना सकस दूध मिळेल याची खात्री नाही. पिशवीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. सरकारला प्लॅस्टीक पिशव्या गोळा करण्याची जबाबदारी विक्रेत्यांवर टाकायची असेल तर त्यांनी महानंदमधे प्रथदर्शी प्रकल्प सुरु केला पाहिजे. त्यानंतर इतर दुग्ध व्यावसायिकांना प्लॅस्कीटक पिशव्या संकलनाची जबाबदारी दिली पाहीजे. 
सध्या दुधाचा प्रवास डेअरी, वितरक, दुकानदार आणि घरपोच सेवा देणारे आणि ग्राहक असा आहे. यासाठी विविध घटकांना ५ ते दहा रुपये प्रतिलिटर मोबदला द्यावा लागतो. रिकाम्या पिशव्या पुन्हा गोळा करायच्या असतील तर उलट प्रक्रिया राबवावी लागेल. त्याचा भुर्दंड ग्राहकांवरच पडेल. स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारनेच प्लॅस्टीक पिशव्यांच्या संकलनाची आणि त्यावर प्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली पाहीजे. त्यासाठी गरजे नुसार स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. दूध खरेदीसाठी यापूर्वी जसे अनुदान दिले होते. त्या प्रमाणे प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी सुरुवातीच्या काळात अनुदान देता येईल का? याचाही विचार झाला पाहिजे, असे मत दूध व्यावसायिकांनी मांडल्याची माहिती दूध संघाचे सचिव प्रकाश कुतवळ आणि उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. 
----------------
महापालिकेने घेतला दूध पिशवी संकलनाचा आढावा
दूध प्लॅस्टीक पिशवी संकलनासाठी डेअरी मालकांकडून कोणते उपाय करण्यात येत आहे, त्याचा आढावा महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सोमवारी घेतला. पिशव्यांचे संकलन, प्रक्रिया आणि प्रकल्प करण्यासाठी लागणारी जागा याची माहिती देण्याची सूचना मोळक यांनी डेअरी व्यावसायिकांना केली. 

Web Title: Dairy owners' warning of selling milk on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.