पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नऊ दिवसांपासून संततधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 11:10 AM2019-08-03T11:10:28+5:302019-08-03T11:12:52+5:30

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.

Dam overflow in the pune district | पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नऊ दिवसांपासून संततधार पाऊस

पुणे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नऊ दिवसांपासून संततधार पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्दे डिंभेच्या पाच दरवाजांतून ५००० क्युसेक्सने विसर्ग  कुकडी प्रकल्पातील धरणे भरण्याच्या मार्गावरवडज, चिल्हेवाडी धरणांतून कुकडी नदीत पाणी सोडले 

घोडेगाव/ नारायणगाव  : घोडेगाव-आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला वरदान ठरलेले डिंभे धरण शुक्रवारी पूर्ण भरले. यामुळे धरणाच्या पाच दरवाजांतून घोड नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.
 डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. २५ जुलैपासून पडत असलेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात सध्या ९० टक्के साठा झाला असून, पावसाचा जोर वाढल्यास जास्त क्षमतेने विसर्ग सोडावा लागू नये म्हणून आत्ताचा धरणाच्या पाच दरवाजातून ५००० क्युसेक्सने पाणी सोडले आहे. सध्या धरणात १२००० क्युसेक्सने पाणी येत आहे. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अजूनही सुरू आहे. तसेच धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून, लवकरच या कालव्याला पाणी सोडले जाणार आहे. 
प्रकल्पातील येडगाव धरण ९६ टक्के भरले आहे. माणिकडोह धरण ४५.०७ टक्के आणि वडज धरण ४५.३५ टक्के भरलेले आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये सरासरी ५८.१५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे यांनी दिली. दरम्यान, वडज व येडगाव धरणातून नदी आणि कालव्याद्वारे विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या वर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.   
...
आजमितीला कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांमध्ये ११७५८ द.ल.घ.फू. (८५.१५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी १७४७६ द.ल.घ.फू. (५७.२३ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीपेक्षा साधारण १ टक्क्याने पाणीसाठा जास्त उपलब्ध झाला असल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. 
..........
घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून जास्त क्षमतेने पाणी सोडावे लागू शकते. यासाठी नदीकाठच्या गावे, वाड्यावस्त्यांमध्ये राहणाºया ग्रामस्थांनी दक्ष राहावे. तसेच नदीकाठी असलेल्या मोटारी, इंजिने, शेती अवजारे, पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची जीवित अगर वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उपअभियंता एस. टी. देवरे व शाखा अभियंता तान्हाजी चिखले यांनी केले आहे.   
.....
भामा-आसखेड धरणातून विसर्ग 
आसखेड : भामा-आसखेड धरण शुक्रवारी सायंकाळी ७  वाजेपर्यंत ९८ टक्के भरले. धरणातून ८ वाजता २ हजार ११८ क्युसेक्सने भामा नदीला सोडण्यात आले. विसर्ग आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्यात येईल, असे धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी सांगितले.  पुढील पर्ज्यन्यमानानुसार विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तरी धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाºया नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.  
.............

डिंभेच्या पाच दरवाजांतून ५००० क्युसेक्सने विसर्ग 
* कुकडी प्रकल्पातील धरणे भरण्याच्या मार्गावर
* वडज, चिल्हेवाडी धरणांतून कुकडी नदीत पाणी सोडले 

....
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे सर्व धरणे जवळपास भरली आहेत. काही धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग नद्यांमध्ये सोडला जात असल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी कुडकी प्रकल्पातील महत्त्वाचे डिंभे धरण हे ९० टक्के भरले. सुरक्षेचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग सुरू आहे. कुकडी प्रकल्पातील वडज, चिल्हेवाडी धरणाबरोबरच खडकवासला प्रकल्पातील पानशेत भरल्यामुळे रात्री धरणातून पाणी सोडण्यात आले. यामुळे पाण्याची चिंता मिटली असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. 
.....
डिंभे धरण पर्जन्यमापन केंद्रात शुक्रवारी (दि. २) या वर्षीचा एकूण पाऊस 
1000 
मिमी पडला. 
मागील वर्षी 
आजच्या तारखेला 
600मिमी एकूण पाऊस होता. या वर्षी मागील तीन वर्षांच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. 

Web Title: Dam overflow in the pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.