वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:51+5:302021-03-24T04:10:51+5:30
वाकी बुद्र वाकी बुद्रुक : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाकी बुद्रुक येथील ...
वाकी बुद्र
वाकी बुद्रुक :
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाकी बुद्रुक येथील शेतकरी दत्तात्रय भागुजी जरे यांच्या शेतात असणारा गुरांचा गोठा वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त झाला आहे.
कोरोना महामारी द्रू असताना वारंवार शेतकऱ्यांवर वेगवेगळी संकटे येत आहेत.
अशातच ऐन भरात आलेली पिकेसुद्धा या सोसाट्याच्या वाऱ्याने सपाट झालेली पाहावयास मिळत आहे.
वादळी वाऱ्यात गुरांच्या गोठ्याचे पूर्ण छत उडून ते पुढच्या बाजूला असणाऱ्या विजेच्या खांबावर आदळले व त्यांनतर वाकी बुद्रुक गावातील ( जरेवाडी ) परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु झालेल्या नुकसानाबद्दल शासनाची मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी दत्तात्रय भागुजी जरे यांनी व्यक्त केली.
--
फोटो २३ वाकीबुद्रूक फोटोओळ:-
वाकी बुद्रुक येथील शेतकरी दत्तात्रय भागुजी जरे यांच्या शेताजवळ असणाऱ्या गोठ्याचे संपूर्ण छत वादळी वाऱ्याने उडून गोठ्याचे नुकसान झाले आहे.