साठवलेल्या कांद्यावर युरिया टाकल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:10 AM2021-05-16T04:10:31+5:302021-05-16T04:10:31+5:30
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: राजुरी (ता. जुन्नर) येथील सुनीता सुनील हाडवळे यांची त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच त्यांची कांद्याची आरण होती. ...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: राजुरी (ता. जुन्नर) येथील सुनीता सुनील हाडवळे यांची त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच त्यांची कांद्याची आरण होती. शनिवारी सकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांचे दीर विलास हाडवळे हे कागद टाकण्यासाठी कांद्याच्या आरणीजवळ गेले असता आरणीतील कांदा पूर्णपणे सडून त्याचा वास येत होता, तर त्यांना या आरणीवर व जवळ पडलेला काही प्रमाणात युरिया आढळून आला. त्यांनी कांद्यावरील पात बाजूला केली असता आतमध्ये संपूर्ण कांदा सडलेला दिसला. जवळपास दोनशे कांद्याच्या पिशवी भरतील एवढा कांदा या ठिकाणी होता.यापैकी फक्त वीस ते पंचवीस पिशव्या भरतील एवढाच कांदा थोड्याफार प्रमाणात राहिलेला आहे. तोही काही दिवसांनी सडून जाईल अशी शक्यता आहे.
या नुकसानीचा कृषी अधिकारी राजश्री नरवडे, तसेच तलाठी कुमावत यांनी पंचनामा केला असून घटनास्थळी गावचे उपसरपंच माऊली शेळके, गौरव घंगाळे,विवेक शेळके,वल्लभ शेळके यांनी भेट दिली.