दौंडची अस्वच्छ भाजीमंडई तोडणार

By admin | Published: May 12, 2017 04:58 AM2017-05-12T04:58:49+5:302017-05-12T04:58:49+5:30

शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या गेल्या तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्या. या वृत्तमालिकेचे शहरातील नागरिकांनी स्वागत करून आभार मानले.

Damage of Daund's stale vegetables will break | दौंडची अस्वच्छ भाजीमंडई तोडणार

दौंडची अस्वच्छ भाजीमंडई तोडणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या गेल्या तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्या. या वृत्तमालिकेचे शहरातील नागरिकांनी स्वागत करून आभार मानले. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत दखल घेतली आहे. बुधवार (दि.१०) रोजी ‘दौंडच्या भाजीमंडईचा होतोय कचरा डेपो’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने घाणीच्या विळख्यात अडकलेल्या व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, जिजाबा दिवेकर, नगरसेवक शहानवाज पठाण, आरोग्य अधिकारी शाहू पाटील, राजू त्रिभूवन यांनी घाणीच्या साम्राज्यातील इमारतीच्या परिसराला भेट दिली. तेव्हा भाजी मंडईतील व्यापारी जमा झाले. त्यांनी देखील इमारतीतील घाणीच्या साम्राज्याबाबत नाराजी व्यक्त केली. सदरच्या इमारतीतील कचरा काढून ही इमारत पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन
त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Damage of Daund's stale vegetables will break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.