वाल्हेत वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:12 AM2021-05-26T04:12:01+5:302021-05-26T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाल्हे : वाल्हे परिसरात मंगळवारी (दि.२५) जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक घरांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाल्हे : वाल्हे परिसरात मंगळवारी (दि.२५) जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे अनेक घरांचे पत्रे उडाली. तर पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
वाल्हे येथे दोन दिवसांपूर्वी जोरदार वादळी पाऊस झाला होता. त्यानंतर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाऱ्याचा वेगामुळे येथील काही घरांची पत्रे आणि काैले उडाली. पावसामुळे दिनेश कुंभार, बाळासाहेब भुजबळ, कैलास भुजबळ यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी गोठ्यांची पडझड झाली. शेतात पावसाचे पाणी साचल्याने पिकांचेही नुकसान झाले. पाण्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते. वादळामुळे डाळिंब आणि सीताफळाच्या फुलांचे नुकसान झाले आहे.
पुणे-पंढरपूर महामार्गावर रामसिंग ढाबा ते वाल्हे एसटी स्टँडपर्यंत काही झाडे पडली. तर काही झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. पाऊस व वारा बंद झाल्यावर पोलिसांनी या मार्गावरील पडलेली झाडे पोलीस मित्रांच्या मदतीने बाजूला केली व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.