पावसामुळे कांदा, बाजरीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:49+5:302021-05-20T04:09:49+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी कांदा लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते. कांदा काढणीला मे महिन्यात सुरुवात होते. ...
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी कांदा लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात केली जाते. कांदा काढणीला मे महिन्यात सुरुवात होते. सध्या कांदा काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. जास्त करून अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, धामणी, पारगाव, मेंगडेवाडी, लाखानगाव, देवगाव या गावांतून डिंभा उजवा कालवा व घोड नदी बारमाही पाण्याने वाहत असते. त्यामुळे वरील गावांत कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु गेली दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा व बाजरीचे पीक भिजल्याने खराब झालेला कांदा निवडून मिळेल त्या बाजारभावाने विक्रीसाठी काढला आहे. सध्या कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने ज्या शेतकऱ्याकडे कांदा चाळ आहे, अशा शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, गरीब शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सोय नसल्यामुळे त्यांनी मिळेल त्या बाजारभावाने कांदा विक्रीसाठी काढला आहे.
अवसरी खुर्द शेतकरी येथील मानसिंग विश्वनाथ शिंदे यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा पावसाने भिजल्याने मिळेल त्या बाजारभावाने विक्रीसाठी काढला आहे.
१९ अवसरी