भुलेश्वर डोंगरावरील आगीत दहा हेक्टरचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:20+5:302020-12-31T04:12:20+5:30
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदीराच्या डोंगरावर आग लागुन वन विभागातील गट ...
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदीराच्या डोंगरावर आग लागुन वन विभागातील गट नंबर ५२९ मधील जवळपास दहा हेक्टरवरील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी जळीतग्रस्त भुलेश्वर डोंगराची पहाणी करुन जळलेल्या झाडांना पाणी सोडण्याच्या सुचना केल्या.
गेली पंधरा वर्षापासून भुलेश्वर वन विभागातील सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. वन विभागातील झाडांमुळे श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थानच्या सौदर्याचा भर पडली आहे. मात्र आगीच्या प्रकारानंतर मंदिर परीसर ओस पडला आहे. वन विभागात मोठ्या प्रमाणात गवत वाढून वाळलेले असल्याने आग विझवण्यात आपयश आले वन विभागाकडून जाळ पट्टे काढण्यात आले. नाही यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली या आगीत मोठमोठी झाडे जळुन गेली श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते.आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली होती माञ सर्वच झाडे जळून गेली. माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी जळीत डोंगराची पहाणी केली
--
माळशिरस ग्रामस्थ व पुरातत्वविभाग यांच्या माध्यमातून भुलेश्वर मंदिरासमोर सुशोभीकरण करण्यात आले होते. परंतु सर्व जळून गेले मात्र आता नव्याने वन विभाग उभा करणे गरजचे आहे यासाठी माळशिरस ग्रामपंचायत प्रयत्नशील राहणार आहे.
महादेव बोरावके, सरपंच, माळशिरस
--
२० भुलेश्वर डोंगरावरील आग
फोटो ओळ - जळलेल्या भुलेश्वर डोंगराची पहाणी करताना माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके