रानडुक्करामुळे राजुरीत द्राक्षबागेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:19+5:302021-06-05T04:09:19+5:30

राजुरी परिसरात वनविभागाचे हद्दीतील जंगलात रानडुकरांचा वावर आहे. ही रानडुकरे खाद्यासाठी शेतकरीवर्गाचे पिकांचे नुकसान करतात. लवणमळा शिवारात वनविभागाचे डोंगरालगत ...

Damage to vineyards in Rajuri due to wild boar | रानडुक्करामुळे राजुरीत द्राक्षबागेचे नुकसान

रानडुक्करामुळे राजुरीत द्राक्षबागेचे नुकसान

Next

राजुरी परिसरात वनविभागाचे हद्दीतील जंगलात रानडुकरांचा वावर आहे. ही रानडुकरे खाद्यासाठी शेतकरीवर्गाचे पिकांचे नुकसान करतात. लवणमळा शिवारात वनविभागाचे डोंगरालगत सुभाष पाटील औटी यांची अडीच एकर क्षेत्रात द्राक्षबाग आहे. दरम्यान, खाद्याच्या शोधात असलेली ही रानडुकरे औटी यांचे द्राक्षबागेत द्राक्षांचे झाडालगत तसेच इतर ठिकाणी उकरत या झाडांच्या मुळ्या कुरतडत असल्याने नुकसान होत आहे. गेली दोन वर्षेही उन्हाळ्यात त्यांच्या बागेचे रानडुकरांनी नुकसान केले होते. तसेच द्राक्षबागेला पाणी देण्यासाठी केलेल्या ठिबक सिंचनाचे नळ्याही रानडुकरे कुरतडत आहेत. द्राक्षबागेसाठी खर्च मोठा येतो. त्यातच रानडुकरे द्राक्षबागेचे नुकसान करत असल्याने उत्पादनात घट होणार असल्याने आर्थिक नुकसान होणार असल्याचे सुभाष पाटील औटी यांनी सांगितले.

--

फोटो क्रमांक : ०४आळेफाटा रानडुक्कर फोटो ओळी : राजुरी लवणमळा येथे द्राक्षबागेत रानडुकरांनी उकरलेले खड्डे.

Web Title: Damage to vineyards in Rajuri due to wild boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.