तेजस्विनी बससाठी दामिनी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:01 AM2018-09-19T03:01:13+5:302018-09-19T03:01:43+5:30

पीएमपी महामंडळाचा निर्णय; चार वरिष्ठ महिलांचा समावेश

Damini team for Tejaswini bus | तेजस्विनी बससाठी दामिनी पथक

तेजस्विनी बससाठी दामिनी पथक

Next

पुणे : खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी बस’मध्ये तिकीट तपासणीसाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. बसमध्ये तिकीट तपासणीसाठी गेलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना महिला प्रवाशांकडून सहकार्य केले जात नसल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) हा निर्णय घेतला आहे. या पथकामध्ये ‘पीएमपी’मधील चार वरिष्ठ महिला कर्मचारी असतील.
जागतिक महिला दिनापासून ‘पीएमपी’ प्रशासनाने महिला विशेष बस सुरू केल्या आहेत. ‘तेजस्विनी’ नावाने सुरू असलेल्या बससेवेला महिला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकूण प्रवाशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याने ही बससेवा लोकप्रिय ठरली आहे. सध्या एकूण ९ मार्गांवर ३० हून अधिक मिडी बसमार्फत ही सेवा सुरू आहे. दररोज जवळपास दहा हजार महिला या बसने प्रवास करतात. मात्र, काही महिला विनातिकीट प्रवास करत असल्याचेही आढळून आले आहे. तिकीट तपासणीसाठी सध्या पीएमपीकडे विविध पथके आहेत. या पथकांकडून बसमध्ये अचानक जाऊन प्रवाशांची तिकिटे तपासली जातात.
तेजस्विनी बसमध्येही ही पथके जातात. पण, अनेकदा काही महिलांकडून या पथकातील पुरुष कर्मचाºयांना सहकार्य केले जात नाही. त्यांच्यावर विविध प्रकारे आरोप केले जातात. याबाबत प्रशासनाकडेही तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पहिल्यांदाच तिकीट तपासणीसाठी खास दामिनी पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘पीएमपी’मध्ये सध्या जवळपास १३७ महिला वाहक आहेत. त्यापैकी वरिष्ठ वाहकांकडून दामिनी पथकात निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील चार वरिष्ठ कर्मचाºयांची निवड करण्यात आली. त्यांना तिकीट तपासणीचे प्रशिक्षण दिले जाईल. दररोज किमान तीन कर्मचारी या पथकामध्ये असतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन दिले जाणार आहे. हे पथक दिवसभर केवळ तेजस्विनी बसमध्ये तिकीट तपासणी करणार आहे. त्यामुळे आता या बसमधील फुकट्या महिला प्रवाशांवर वचक ठेवता येणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.

Web Title: Damini team for Tejaswini bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.