दांपत्यास जबरी मारहाण

By admin | Published: May 31, 2017 01:48 AM2017-05-31T01:48:55+5:302017-05-31T01:48:55+5:30

सोलापूर-पुणे रेल्वे गाडीत एका दांपत्यास जबरी मारहाण केल्याप्रकरणी १0 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहीती

Dampatas Lobbing Hunt | दांपत्यास जबरी मारहाण

दांपत्यास जबरी मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : सोलापूर-पुणे रेल्वे गाडीत एका दांपत्यास जबरी मारहाण केल्याप्रकरणी १0 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहीती दौंड रेल्वे पोलीस राजकुमार बाफना यांनी दिली.
या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून यातील मुख्यसुत्रधार महिला फरार आहे. जावेद शेख (वय २२), महावीर साळवे ( वय २७ ), सुनील भोसले (वय २0 ), गणेश नगरे ( वय २0 ), महादेव ढवळे ( वय २0 ), सागर शिदे ( वय २१), पदमेश नगरे ( वय २२), अशोक साळवे ( वय ३२ ), गणेश शेलार ( वय १९ ), पैगंबर तांबोळी ( वय २३), विशाल नगरे ( वय ३0) हे सर्व आरोपी पारवडी (तालुका : करमाळा , जिल्हा सोलापूर) येथील रहीवाशी आहेत.
याप्रकरणी भीमराव भोसले ( रा. पुणे ) यांनी दौंड रेल्वे पोलिसांना तक्रार दिली आहे . सोमवारी दुपारी सोलापर रेल्वे स्थानकातून सोलापूर - पुणे पॅसेंजर सुटली. रेल्वेच्या एका डब्यात भीमराव भोसले आणि त्यांचे नातेवाईक बसले होते.
ही सर्व मंडळी लग्न समारंभ ऊरकून घरी परतीच्या प्रवासाला पुणे येथे निघाली होती. म्हाडा स्टेशन सोडल्यावर एका महिलेच्या
धान्य पिशवीला एका लहान मुलाचा पाय लागला.
या महिलेने लहान मुलाच्या कानफटात मारले. यावेळी संबंधीत महिला आणि लहान मुलाच्या नातेवाईकात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलेने मोबाईलवर संवाद साधून
काही व्यक्तींना पारवडी रेल्वे स्थानकाच्या अलीकडील स्टेशनवर बोलावून घेतले.

१० जणाचे टोळके पारवडीच्या आलीकडील स्टेशवर सोलापूर पॅसेंजरच्या बोगीत आले . त्यांनी भीमराव भोसले आणि त्यांच्या पत्नीला लाकडी दांडके, वायरीच्या चाबकाने मारायला सुरूवात केली.
या दांपत्यांना पारवडी स्टेशन येईपर्यंत मारहाण सुरू होती. पारवडी स्टेशन आल्यावर आरोपी आणि मुख्य सुत्रधार महिलेने पळ काढला.
रेल्वेगाडी रात्री साडे आठच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकात आली, त्यानंतर मारहाण झालेल्या दांपत्यांनी दौंड रेल्वे पोलीसांना तक्रार दिली.
त्यानुसार दौंड पोलिसांनी पारवडी येथे जाऊन मंगळवारी पहाटेच्या सुमारास आरोपींना अटक केली. नंतर हा गुन्हा कुर्डूवाडी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

Web Title: Dampatas Lobbing Hunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.